Elvish Yadav Arrest: एल्विश यादवला पोलिसांनी घेतलं ताब्यात, सापाच्या विषाची तस्करी करण्याचा आरोप

Elvish Yadav News : ल्विश यादवला पोलिसांनी घेतलं ताब्यात, सापाच्या विषाची तस्करी करण्याचा आरोप
Elvish Yadav Arrest
Elvish Yadav ArrestSaam Digital
Published On

Elvish Yadav Arrest:

बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव याला पोलिसांनी राजस्थानमधील कोटा येथून ताब्यात घेतलं आहे. भाजप खासदार मनेका गांधी यांनी विजेता एल्विश यादव याच्यावर सापाचे विष बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप केला आहे. तसेच त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एल्विश यादवने बॅरिकेडिंग तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला कोटा ग्रामीणच्या रामगंज सुकेत परिसरातून पकडण्यात आले. एल्विशची कार कोटा पोलिसांनी जप्त केल्याचे बोलले जात आहे. प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव अलीकडेच नोएडामधील रेव्ह पार्टी प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Elvish Yadav Arrest
ISRO Chief: सिवन यांना एस सोमनाथ नको होते इस्रोचे प्रमुख; आत्मकथेवरुन वाद होताच सोमनाथ यांनी दिलं स्पष्टीकरण

रेव्ह पार्ट्यांमध्ये कथित सापाचे विष पुरवल्याबद्दल एल्विश यादव यांच्यासह सहा जणांविरुद्ध नोएडा सेक्टर 49 पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एल्विश यादव पार्ट्यांमध्ये विष पुरवण्यासाठी मोठी रक्कम घेत असल्याचा आरोप आहे. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही बातमी आल्यानंतर सलमान खानने एल्विश यादवचे समर्थन केले होते. अलीकडेच एल्विश यादव 'बिग बॉस 17' च्या सेटवर दिसला होता. 'बोलेरो' म्युझिक व्हिडिओच्या प्रमोशनसाठी एल्विश बिग बॉसच्या सेटवर पोहोचला होता.

Elvish Yadav Arrest
Mark Zuckerberg Injury: मार्शल आर्ट्स आलं अंगाशी, मार्क झुकरबर्गचा मोडला पाय; रुग्णालयात दाखल

एका रिपोर्ट्सनुसार, बिग बॉसच्या सेटवर पोहोचल्यानंतर सलमान खानने रेव्ह पार्टी प्रकरणात अडकलेल्या एल्विश यादवला सल्ला दिला होता की, जेव्हा एखादा सामान्य माणूस उंचीवर पोहोचतो, तेव्हा लोकांना त्याचा हेवा वाटू लागतो, हे सर्व घडत राहते. तू या सगळ्याची काळजी करू नका. तू यशस्वी आहेस, असे सलमानने एल्विशला सांगितले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com