Badshah in Fairplay App Case
Badshah in Fairplay App Case Instagram @badboyshah

Badshah in Trouble: गायक बादशहा अ‍ॅपच्या जाहिरातीमुळे अडचणीत; महाराष्ट्र सायबर सेल करणार चौकशी

Fairplay App Case: प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाहला महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे

Badshah Cyber Cell Inquiry:

प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाहला महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. फेअरप्ले नावाचे अॅप कोणत्याही प्रकारची परवानगी नसतानाही आयपीएल दाखवत असल्याचा आरोप वाय कॉम या कंपनीने केला आहे. वाय कॉमच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सायबर सेलने फेअरप्लेवर डिजिटलवर कॉपी राईटचा गुन्हा दाखल केला.

बादशाहने फेअर प्लेची जाहिरात केली होती, त्यामुळे त्याला सायबर चौकशीसाठी बोलावण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या प्रकरणी बॉलिवूडमधील ४० कलाकारांना समन्स बजावले जाऊ शकते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनेही याची जाहिरात केली असून त्यालाही समन्स बजावले जाऊ शकते.

फेअरप्ले अॅप हा एक महादेव अॅपसारखा एक बेटिंग अॅप आहे. या अॅपवर परवानगीशिवाय आयपीएल मॅच दाखविण्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर वाय कॉम या कंपनीने सायबर सेल्सही संपर्क साधत डिजिटल कॉपीराईटची तक्रार केली आहे.

सेलिब्रिटींना सामान्य लोक फॉलो करतात. त्यामुळे सेलेब्रिटी (Celebrity) ज्या जाहिराती करत असतात त्याच्या परिणाम प्रेक्षकांवर कमी-अधिक प्रमाणात होत असतो. त्यामुळे शासनाने देखील अनेक कंपन्या आणि कलाकारांना नोटीस बजावली होती.

Badshah in Fairplay App Case
KWK 8 New Promo: देओल बंधू लावणार 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी; सनी, बॉबी करणार पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफविषयीचे खुलासे

बादशहाला नागपूर न्यायालयाने अल्टीमेटम दिला होता. बादशाहला 7 जानेवारी पर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. बादशहा विरोधात अश्लील गाणं गायल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. बादशहा पोलिसांना सहकार्य करत नसल्याचं आरोप करण्यात आला होता.

बादशाह सध्या 'हसल' आणि 'इंडियाड गॉट टॅलेंट' या शोचे परिक्षण करत आहे. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com