Vidya Balan: विद्या बालनच्या नावे बनावट इन्स्टा अकाऊंट बनवून फसवणूक, अभिनेत्रीकडून FIR दाखल

Vidya Balan Fake Insta ID: विद्या बालनचा चाहतावर्ग मोठा असल्याचे लक्षात घेऊन एकाने तिच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट उघडून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची माहिती मिळताच विद्या बालनने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली.
Vidya Balan
Vidya Balan Instagram @balanvidya

Vidya Balan Filed FIR:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. विद्या बालन नेहमी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कॉमेडी व्हिडीओ, नवीन प्रोजेक्टचे व्हिडीओ त्याचसोबत ट्रेडिंग ऑडिओवर तयार केलेल व्हिडीओ शेअर करत असते. विद्या बालनचा चाहतावर्ग मोठा असल्याचे लक्षात घेऊन एकाने तिच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट उघडून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची माहिती मिळताच विद्या बालनने थेट पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली.

अज्ञात व्यक्तीने चुकीच्या कृत्यांसाठी विद्या बालनचे बनावट इन्स्टाग्राम आणि जीमेल अकाऊंट तयार केले होते. ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा अभिनेत्रीला इंडस्ट्रीतील तिच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले होते की, 'विद्या असल्याचा दावा करणाऱ्या कुणीतरी मला व्हॉट्सॲपवर मेसेज करून संवाद साधला होता. त्या व्यक्तीने मला काम देण्याचे आश्वासनही दिले होते.' विद्याच्या परिचित व्यक्तीने तिच्याशी याबद्दल चर्चा केली तेव्हा अभिनेत्रीला धक्का बसला. विद्याने त्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगितले की, 'मी कोणाशीही संपर्क साधला नाही. तसंच ज्या नंबरवरून तुझ्याशी संपर्क करण्यात आला होता तो माझा नाहीच.'

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विद्या बालनने थेट खार पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. आरोपीने विद्या बालनच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट उघडून पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपीने विद्या बालनचे बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट आणि बनावट ईमेल आयडी बनवून काहीजणांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. खार पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.

Vidya Balan
बिग बॉस विनर Divya Agarwal बिझनेसमन अपूर्व पाडगांवकरसोबत अडकली विवाहबंधनात, लग्नाचे क्युट फोटो व्हायरल

अभिनेत्रीने माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार म्हणजे आयटी ॲक्टनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी 19 फेब्रुवारी रोजी विद्या बालनने तिची व्यवस्थापक अदिती संधू यांच्यामार्फत खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. विद्या बालनच्या नावाने Gmail वर vidyabalanspeaks@gmail.com आणि Instagram वर vidya.balan.pvt असे अकाऊंट तयार करून लोकांची फसवणूक केली. आरोपी विद्या बालनच्या या बनावट अकाऊंटद्वारे लोकांशी संपर्क करत होता आणि त्यांना नोकरी देण्याची खोटी आश्वासने देत होता.

Vidya Balan
Dada Saheb Phalke Award 2024 मध्ये शाहरुख खान ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, पाहा विनर लिस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com