दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड शो (Dada Saheb Phalke Award 2024) 20 फेब्रुवारीला मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बॉलिवूडपासून ते टीव्हीपर्यंतच्या स्टार्सनी हजेरी लावली. यावेळी या सेलिब्रिटींनी जबरदस्त ड्रेसिंग करत या शोमध्ये उपस्थित राहून या अवॉर्ड शोमध्ये चार चाँद लावले. या अवॉर्ड शोमधील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या अवॉर्ड शोमध्ये बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानपासून बॉबी देओलपर्यंत अनेकांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या दादासाहेब फाळके अवॉर्ड शोकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर हा शो 20 फेब्रुवारीला मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. या अवॉर्ड शोमध्ये विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाहरुख खानला 'जवान' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. तर नयनताराला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अभिनेता बॉबी देओलला नकारात्मक भूमिकेसाठी पुरस्कार देण्यात आला. त्याचसोबत टीव्ही स्टार्सना देखील दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणा-कोणाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याची संपूर्ण यादी आपण पाहणार आहोत...
- सर्वोत्कृष्ट अभिनेता - शाहरुख खान (जवान चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नयनतारा (जवान चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेतील अभिनेता - बॉबी देओल (अॅनिमल चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) - विकी कौशल (सॅम बहादूर चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - संदीप रेड्डी वंगा (अॅनिमल चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष - वरुण जैन ('तेरे वास्ते'- जरा हटके जरा बचके चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - शिल्पा राव (बेशरम रंग- पठान चित्रपट)
- समीक्षक वेब सिरीजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - करिश्मा तन्ना (स्कूप वेबसीरिज)
- चित्रपट उद्योगातील उत्कृष्ट योगदान - मौसमी चॅटर्जी
- संगीत उद्योगातील उत्कृष्ट योगदान - के. जे. येसुदास
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - अनिरुद्ध रविचंदर
- वर्षातील दूरदर्शन मालिका - घुम है किसी के प्यार में
- टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता - नील भट्ट
- टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - रुपाली गांगुली
दरम्यान, दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड 2024 च्या विजेत्यांची लिस्ट समोर आल्यानंतर या सेलिब्रिटींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या सेलिब्रिटींचे चाहते सोशल मीडियावर अभिनंदन करताना दिसत आहेत. दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यामध्ये 'जवान' आणि 'अॅनिमल' या चित्रपटांची जादू पाहायला मिळाली. राणी मुखर्जी, ॲटली कुमार, शाहिद कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना विविध श्रेणींमध्ये भारतीय सिने जगतातील प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.