Salman Khan House Firing: आरोपींना पकडण्यासाठी पोलीस बनले भाविक; हल्लेखोर मंदिरात झोपले होते बेसावध, घटनास्थळी नेमकं काय घडलं?

Salman Khan House Firing: सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या आधिकाऱ्यांनी मंदिरात जाऊन भाविकांच्या वेशात दोन्ही आरोपींना पकडल्याची माहिती समोर आली आहे.
Salman Khan House Firing Case Update
Salman Khan House Firing Case UpdateSaam TV

Salman Khan Home Fired Two Shooters Arrest

अभिनेता सलमान खानच्या (Bollywood Actor Salman Khan) वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर (Bandra Galaxy Apartment) १४ एप्रिल रोजी दोन अज्ञातांनी दुचाकीवरून येत गोळीबार केल्याची घटना घडली. या संपूर्ण प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अभिनेत्याच्या आणि त्याच्या परिवाराच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशातच या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या आधिकाऱ्यांनी मंदिरात जाऊन भाविकांच्या वेशात दोन्ही आरोपींना पकडल्याची माहिती समोर आली आहे.

Salman Khan House Firing Case Update
Swargandharva Sudhir Phadke: ‘जे माझ्या मनाला भावतं, ते माझ्या संगीतातून आणि गळ्यातून उतरतं...’; ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चा ट्रेलर प्रदर्शित

सोमवारी भुजच्या मातेनू मढ मंदिरात भाविकांची संख्या जास्त होती. आरोपी मंदिरात लपल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी भाविकांच्या वेशात मंदिरात त्यांनी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मंदिरामध्ये भाविकांची संख्या जास्त असल्याने पोलिसांनी मंदिरातले वातावरण पाहून स्वत: भाविक बनत मंदिरामध्ये जाण्याचे ठरवले. मंदिरामध्ये पोलिसांना विकी गुप्ता आणि सागर पाल हे दोघेही आरोपी एका कोपऱ्यात बेसावधपणे झोपलेले दिसले. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही उठवून त्यांची चौकशी केली असता, त्यांनी स्वत: गुन्ह्याची कबुली दिली. दोघांनीही गुन्ह्याची कबुली देताच त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे.

विकी गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१) हे दोघेही बिहारचे रहिवासी आहेत. पहाटे गोळीबाराची घटना घडल्यानंतर हे आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मातेनू मध गावातून मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या वेळी गुप्ता मोटारसायकल चालवत होता आणि पाल हा त्यांच्या पाठीमागे बसला होता. त्यानेच सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडल्या होत्या. आज या दोघांना मुंबई येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. गोळीबार कटाचा उलगडा करण्यासाठी आणि या घटनेमागील सूत्रधार ओळखण्यासाठी कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचं सांगत पोलिसांनी या आरोपींना १४ दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी केली.

Salman Khan House Firing Case Update
BMCM Day 6 Collection: अक्षय कुमारच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; जगभरामध्ये कमाई जोमात

अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एल एस पडेन यांनी दोन्ही आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दोघांनी सलमानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार केला होता. या गोळीबारात या दोघांचा सक्रिय सहभाग होता, प्राथमिक चौकशीत या आरोपींनी गोळीबार केल्याचा गुन्हा कबूल केलाय, असं पोलिसांनी सांगितले. आरोपींचा सलमान खान व्यतिरिक्त इतर कोणावर हल्ला करण्याचा प्लान होता का? याचा तपास करण्यासाठी आरोपीला ताब्यात घेणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी त्यांच्या रिमांड नोटमध्ये म्हटले आहे. नोटनुसार अद्याप या घटनेत वापरलेले बंदुक जप्त केलेले नाही. आरोपींनी वापरलेल्या मोटारसायकलबाबतही चौकशी करणे आवश्यक असल्याचं पोलीस म्हणालेत. तत्पूर्वी, या प्रकरणी पोलिसांनी सलमान खानचाही जबाब नोंदविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Salman Khan House Firing Case Update
Salman Khans House Firing Case: सलमान खानला ठार करण्याच्या इराद्यानंच गोळीबार; तपासात धक्कादायक माहिती झाली उघड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com