Pimpari Chinchwad Crime: तब्बल २४ घरफोडीचे गुन्हे, मुंबई, ठाण्यासह पालघर जिल्ह्यात धुमाकूळ.. पोलिसांनी २ अट्टल दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या

Crime News: वाकड पोलिसांनी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांनी २४ ठिकाणी घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे.
Pimpari Chinchwad Crime
Pimpari Chinchwad CrimeSaamtv

Pimpari Chinchwad Crime:

पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन अट्टल दरोडेखोरांना बेड्या ठोकल्यात. शहरातील वाकड पोलिसांनी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांनी २४ ठिकाणी घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. (Crime News in Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) शहरातील वाकड पोलिसांनी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. अब्दुल उर्फ चिरा इद्रिस शेख आणि धर्मेश रामआचरे दिवाकर अशी घरफोडी करणाऱ्या दोन्हीं अट्टल गुन्हेगारांची नाव आहेत.

या दोघांनी मुंबई, ठाणे (Mumbai, Thane) आणि पालघर जिल्ह्यातील 24 घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी (Wakad Police) त्यांच्याकडून एकूण एक लाख 22 हजार रुपयये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pimpari Chinchwad Crime
Vijay Wadettiwar News: ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरुन विरोधक आक्रमक, सरकारला धारेवर धरलं; सभागृहात काय घडलं?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी वाकड पोलिस स्टेशन हद्दीतील प्रिस्प्रोटिन फाइल पेज वन या सोसायटीमधील पाचव्या म्हणल्यावर 16 नोव्हेंबरला घरफोडी केली होती. घरफोडी करून दोन्ही आरोपी पसार झाले होते. मात्र वाकड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर काही तांत्रिक बाबीचा विश्लेषण करून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. (Latest Marathi News)

Pimpari Chinchwad Crime
Mahua Moitra Case: ''माँ दुर्गा आली आहे... आता महाभारताचं रण पेटलं..'', महुआ मोईत्रा यांच्याविरोधातील अहवालावर संसदेत गदारोळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com