Mahua Moitra Case: ''माँ दुर्गा आली आहे... आता महाभारताचं रण पेटलं..'', महुआ मोईत्रा यांच्याविरोधातील अहवालावर संसदेत गदारोळ

Mahua Moitra Case: पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्या प्रकरणात अडचणीस सापडलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यासंदर्भातील एथिक्स कमिटीचा अहवाल आज संसदेत सादर करण्यात आला.
Mahua Moitra Case
Mahua Moitra CaseSaam Digital
Published On

Mahua Moitra Case

पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्या प्रकरणात अडचणीस सापडलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यासंदर्भातील एथिक्स कमिटीचा अहवाल आज संसदेत सादर करण्यात आला. त्यानंदर सभागृहात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला त्याामुळे संसदेचे कामकाज दुपारी २ पर्यंत स्थगित करण्यात आले.

त्या आधी संसदेत पोहोचल्यानंतर महुआ मोईत्रा यांनी, माँ दुर्गा आली आहे, आता बघू काय होतंय ते. माणसावर विनाशाची वेळ येते तेव्हा आधी त्याचा विवेक मरतो. यांनी वस्त्रहरण सुरू केलं त्यामुळे आता महाभारताचं रण पेटलं, असं म्हटलं आहे.

एथिक्स कमिटीच्या अहवालात महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. ९ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील अहवाल समितीने स्वीकारला होता. दरम्यान विरोधक या अहवालावर मतदानाची मागणी करू शकतात त्यामुळे भाजपने आपल्या खासदारांना व्हीप जारी करून सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. २ नोव्हेंबरला झालेल्या एथिक्स कमिटीच्या बैठकीला महुआ उपस्थित राहिल्या होत्या. मात्र पॅनलच्या सदस्यांकडून अश्लिल प्रश्न विचारल्याचा आरोप करत त्या बैठकीतून निघून गेल्या होत्या. त्यातच समितीच्या विरोधी सदस्यांनी महुआ यांना पाठींबा दिला. समितीच्या इतर सदस्यांनी असंसदीय शब्द वापरल्याचा आरोपही केला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahua Moitra Case
MP Assembly Election: निवडणूक लढवण्यासाठी कर्ज काढलं, राजधानीपर्यंत बाईकवरून ३५० किमी प्रवास, झोपडीत राहणाऱ्या आमदाराची संघर्षमय कहाणी

लोकसभेत उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या महुआ मोइत्रा यांच्या विरोधात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला होता. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तसं पत्रही लिहिलं होतं. मोईत्रा यांनी ज्यांच्याकडून लाच घेतल्याचा आरोक करण्यात आला होता ते उद्योगपती दर्शन हिरानंदानी या प्रकरणात माफीचे साक्षीदार झाले आहेत. मोईत्रा यांना महागडे गिफ्ट दिल्याचं हिरानंदानी यांनी कबूल केलं आहे. यासाठी मोईत्रा यांनी ब्लॅकमेल केल्याही आरोत हिरानंदानी यांनी केला आहे. मोईत्रा यांनी या प्रकरणात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Mahua Moitra Case
Indian Navy Officers Qatar: कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ भारतीयांची होणार सुटका? भारत सरकारच्या प्रयत्नांना यश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com