Akshay Kumar Deepfake Video: बॉलिवूडचा खिलाडीही अडकला 'डीपफेक'च्या जाळ्यात; व्हायरल व्हिडीओनं बसला चाहत्यांना धक्का

Akshay Kumar Viral Video: अभिनेता अक्षय कुमार सुद्धा डीपफेक व्हिडीओचा शिकार झाला आहे. सध्या अक्षयचा डिपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Akshay Kumar Deepfake Video
Akshay Kumar Deepfake VideoInstagram
Published On

Akshay Kumar Deepfake Viral Video

एआयच्या मदतीने डीपफेक व्हिडीओ (Deepfake Video) बनवण्याचे प्रकार काही थांबायचे नाव घेत नाहीत. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (AI) मदतीने तयार करण्यात आलेल्या डीपफेक व्हिडीओने (Deepfake Video) बॉलिवूडपासून (Bollywood) साऊथ सेलिब्रिटींचंही टेन्शन चांगलंच वाढलं आहे. (Bollywood)

रश्मिका मंदान्ना, आलिया भट्ट, नोरा फतेहीसह अनेक सेलिब्रिटी डीपफेक व्हिडीओची शिकार होत आहे. नुकताच अभिनेता अक्षय कुमार सुद्धा डीपफेक व्हिडीओचा शिकार झाला आहे. सध्या अक्षयचा डिपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Akshay Kumar)

Akshay Kumar Deepfake Video
Kangana Ranaut: कंगना रनौतला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार; नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, अक्षय कुमारचा एका गेम ॲप्लिकेशनचे समर्थन आणि प्रचार करताना दिसत आहे. सध्या अभिनेत्याचा हा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, अक्षयने कधीही कोणत्याही ॲप्लिकेशनची जाहिरात केलेली नाही. त्या व्हिडीओचा मुळ स्त्रोत काय याची चौकशी केली जात आहे. (Social Media)

अशाप्रकारे खोट्या जाहिरातीमधून प्रचार करुन अभिनेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. त्यातून तातडीनं मार्ग काढण्यात यावेत. अशी मागणी यापूर्वी संबंधित प्रशासनाकडे करण्यात आले आहेत. अक्षय कुमारच्या आधी आलिया भट्ट, रश्मिका मंदान्ना, सोनू सूद, नोरा फतेही, कतरिना कैफ आणि काजोलचे डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. (Entertainment News)

Akshay Kumar Deepfake Video
Ankita- Vicky Home Tour Video: विकी-अंकिताचं आहे कोट्यवधीचं आलिशान घर; ‘तहलका’ने दाखवली घराची झलक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com