Kangana Ranaut: कंगना रनौतला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार; नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Kangana Ranaut Court News: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतविरोधात गीतकार जावेद अख्तर यांनी कनिष्ठ न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. हा खटला स्थगित करण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.
Kangana Ranaut
Kangana RanautSaam Digital
Published On

Bollywood Actress Kangana Ranaut

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतविरोधात गीतकार जावेद अख्तर यांनी कनिष्ठ न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या खटल्याला स्थगिती द्यावी, अशी विनंती करत उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या अभिनेत्री कंगना रनौतला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. कंगनाची मागणी सद्यस्थितीत मान्य करता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी कंगनाची याचिका फेटाळून लावली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने गीतकार जावेद अख्तर यांचा उल्लेख रिपब्लिक चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केला होता. गीतकार जावेद अख्तर यांनी याप्रकरणी कंगनाच्या विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला. कंगनानेसुद्धा जावेद अख्तर यांच्याविरोधात गुन्हेगारी कट, खंडणी व इतर आरोप करत विरोधी तक्रार दाखल केली. अंधेरी न्यायालयाने जावेद अख्तर यांच्यावरील खंडणीचा आरोप रद्द केला व इतर आरोपांप्रकरणी अख्तर यांना २४ जुलै २०२३ मध्ये समन्स बजावले. अख्तर यांनी या समन्सविरोधात दिंडोशी न्यायालयात धाव घेतली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kangana Ranaut
Ankita- Vicky Home Tour Video: विकी-अंकिताचं आहे कोट्यवधीचं आलिशान घर; ‘तहलका’ने दाखवली घराची झलक

दिंडोशी सत्र न्यायालयाने अख्तर यांच्या अर्जावर अंतिम सुनावणी होईपर्यंत रनौतच्या तक्रारीवरून न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली. ही स्थगिती उठल्यानंतर कंगनाविरोधात दाखल केलेल्या खटल्यावर पुन्हा सुनावणी होणार असल्याने कंगनाने उच्च न्यायालयात या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करत ॲड. रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाल्याने न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी हा निकाल आज जाहीर करत कंगनाच्या अब्रुनुकसानीच्या खटल्याला स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली.

Kangana Ranaut
Poonam Pandey Alive: मृत्यू नव्हे तर पब्लिसिटी स्टंट, निधनाच्या चुकीच्या बातमीनंतर पूनम पांडेला नेटकऱ्यांनी सुनावले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com