Viral Video : बंदूक अन् चाकू घेऊन घरात शिरले चोर; धाडसी माय-लेकींनी दोघांना बेदम चोपून पळवून लावलं, व्हिडिओ व्हायरल

Crime Viral Video : चोराच्या हातात चाकू आणि बंदूकीसारखे हत्यार असल्यास सर्वचजण शांत राहतात. मात्र हैद्राबादच्या बेगमपेठेत एका धाडसी माय-लेकींनी अशा चोरांना चांगलाच चोप दिला आहे.
Viral Video
Viral Video Saam TV

CCTV Footage :

चोर चोर असं ऐकलं तरी काळजात धस्स होतं. विचार करा जर तुमच्या घरात चोर शिरला आहे आणि तुमच्यासमोर तो घरातील वस्तू चोरत आहे अशावेळी तुम्ही काय कराल? चोराच्या हातात चाकू आणि बंदूकीसारखे हत्यार असल्यास सर्वचजण शांत राहतात. मात्र हैद्राबादच्या बेगमपेठेत एका धाडसी माय-लेकींनी अशा चोरांना चांगलाच चोप दिला आहे.

Viral Video
School CCTV Footage: शाळेत विद्यार्थ्यांच्या शौचालयात CCTV कॅमेरा; संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सदर घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २१ मार्च रोजी घडली आहे. अमिता मेहता (वय ४२) आणि त्यांच्या मुलीचा पोलिसांनी सत्कार केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुपारच्या सुमारास परिसर शांत असताना दोन व्यक्ती पार्सल घेऊन अमिता यांच्या घरी आल्या. यावेळी घरात एक वृद्ध महिला आणि या दोघी होत्या. घराचे दार वाजवल्यावर दोन व्यक्ती पार्सल घेऊन आल्याचे सांगत त्यांच्या घरामध्ये येऊ लागल्या. काहीवेळातच दोन्ही नराधमांनी लपलेली बंदूक आणि चाकू बाहेर काढले.

यातील एक जण लगेचच घरामध्ये शिरला आणि पैसे तसेच मौलवान वस्तू मागू लागला. त्यावर दरवाजात असलेल्या चोराने चाकू अमिता यांच्या मानेवर धरला. या सर्वांत त्या घाबरल्या नाही. त्यांनी चोराच्या पायावर जोरदार लाथ मारली आणि त्याला खाली पाडले. तितक्यात त्यांच्या मुलीने चाकू दूर फेकला. दोघींनी त्याच्या चेहऱ्यावरील मास्क काढले आणि त्याला बेदम चोपलं.

मात्र तो तेथून पळून गेला. दोघींच्या आवाजाने आजुबाजूच्या व्यक्ती तेथे पोहचल्या. त्यानंतर घरात असलेला दुसरा चोर देखील पळून जाण्यासाठी बाहेर पडला. तितक्यात या माय-लेकींनी त्यालाही कपडलं आणि बेदम चोपलं. या घटनेत दुसऱ्या चोराला सर्वांनी पकडून ठेवलं होतं. त्यानतंर पळून गेलेल्या चोराला पोलिसांनी पकडून आणलं. या दोन्ही माय-लेकींनी दाखवलेल्या धाडसाला सर्वांनी सलाम केला आहे.

Viral Video
Buldhana Crime News : संतापजनक! अंगणवाडी सेविकेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून मारहाण; ३ आरोपींवर गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com