Buldhana Crime News : संतापजनक! अंगणवाडी सेविकेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून मारहाण; ३ आरोपींवर गुन्हा दाखल

Crime News : या संदर्भात अंगणवाडी सेविकाने तातडीने मेहकर पोलिसांत धाव घेतली. दिलेल्या तक्रारीवरून तीन आरोपींवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Buldhana Crime News
Buldhana Crime NewsSaam TV

संजय जाधव

Buldhana :

जागेच्या वादातून अंगणवाडी सेविकेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करत अमानुष मारहाण केल्याची भयंकर घटना बुलढाण्यातून समोर आली आहे. मारहाण करणाऱ्या नराधमाच्या तावडीतून सोडविण्यासाठी महिलेचा भाऊ पुढे आला. तेव्हा त्याला देखील बेदम मारहाण करून दहशत निर्माण करण्यात आली. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.

Buldhana Crime News
Buldhana Lok Sabha Constituency : बुलढाणा लाेकसभा मतदारसंघ काॅंग्रेसला घ्या, पदाधिका-यांचा सामूहिक राजीनामा; नाना पटाेलेंवर दबाव

या संदर्भात अंगणवाडी सेविकाने तातडीने मेहकर पोलिसांत धाव घेतली. दिलेल्या तक्रारीवरून तीन आरोपींवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ही तिच्या आईसोबत मेहकर येथील अण्णाभाउ साठे नगर येथे असलेल्या मोकळ्या जागेची साफसफाई करत होत्या.

तेवढ्यात असलम गवळी आणि त्याचे दोन भाऊ जावेद गवळी तसेच फिरोज गवळी तेथे आला आणि 'आमच्या जागेवर काय करत आहे? येथुन निघुन जा, असे म्हणत त्यांनी महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी तिला इतकं बेदम मारलं की, महिलेचे कपडेही फाडले.

आपल्या बहिणीची मारहाण होत असल्याचं समजताच भावाने त्या ठिकाणी तातडीने धाव घेतली. यावेळी बहिणीची अवस्थापाहून भावाने भावाने तिला मारहाण करणाऱ्यांशी दोन हात केले. मात्र तो एकटाच असल्याने सर्व आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये भाऊ देखील गंभीर जखमी झाला आहे. मारहाण केल्यानंतर सर्व आरोपी तेथून फरार झालेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Buldhana Crime News
Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नीशी अनैतिक संबंधांचा संशय, पोलिसानेच व्यापाऱ्याला गोळी झाडून संपवले; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com