Buldhana Lok Sabha Constituency : बुलढाणा लाेकसभा मतदारसंघ काॅंग्रेसला घ्या, पदाधिका-यांचा सामूहिक राजीनामा; नाना पटाेलेंवर दबाव

Buldhana Congress News : महाविकास आघाडी काही मतदारसंघात अदलाबदल करण्याची शक्यता गृहीत धरुन बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस मतदारसंघावर दावा करीत आहे.
congress wish to contest buldhana lok sabha constituency
congress wish to contest buldhana lok sabha constituency saam tv

Buldhana Lok Sabha Constituency :

लाेकसभा निवडणुकीसाठी काॅंग्रेसने गुरुवारी जाहीर केलेल्या उमेदवारी यादीमध्ये बुलढाणा लाेकसभा मतदारसंघाचा समावेश नाही. त्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा मतदारसंघ संभाजी ब्रिगेडला देऊ असे आश्वासित केले आहे. यामुळे बुलढाणा काॅंग्रेसमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. हा मतदारसंघ काॅंग्रेसला मिळावा यासाठी आज (शुक्रवार) बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सर्वच्या सर्व 11 तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडे सुपुर्द केला. बाेंद्रे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची नाराजी प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांना कळविली आहे. (Maharashtra News)

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अद्यापही महायुती किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झालेली नाही. महायुतीकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव (mp prataprao jadhav) तर महाविकास आघाडीकडून (mahavikas aghadi) ठाकरे गटाचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर (narendra khedekar) यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.

congress wish to contest buldhana lok sabha constituency
अरविंद केजरीवाल दिल्लीचा कारभार चालवू शकतील? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं, अटक बेकायदेशीर

महाविकास आघाडी काही मतदारसंघात अदलाबदल करण्याची शक्यता गृहीत धरुन बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस मतदारसंघावर दावा करीत आहे. काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस वकील जयश्री शेळके यांना उमेदवारी द्यावी यासाठी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते आग्रह करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यातूनच आज दुपारी झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वांनुमते हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यात यावा. काँग्रेसचाच उमेदवार देण्यात यावा असा ठराव करण्यात आला. वकील जयश्री शेळके यांना उमेदवारी द्यावी या मागणीसाठी जिल्ह्यातील 11 तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंकडे दिला.

Edited By : Siddharth Latkar

congress wish to contest buldhana lok sabha constituency
World Water Day : पाणी वाचवा! मालेगावमध्ये जलवाहिनी फुटली, रस्त्याला नदीचे स्वरुप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com