World Water Day : पाणी वाचवा! मालेगावमध्ये जलवाहिनी फुटली, रस्त्याला नदीचे स्वरुप

World Water Day News : जागतिक जलसाक्षरता दिना निमित्त उल्हासनगर येथील व्हिनस चौकात पाणी बचाव या विषयावर एस एस टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाटय सादर केले.
water logged in malegaon
water logged in malegaonsaam tv

- रुपेश पाटील, अजय दुधाणे, अजय सोनवणे

World Water Day :

जागतिक जलसाक्षरता दिना निमित्त पाणी बचाव देश बचाव अशी घोषणा देत आज उल्हासनगर येथे विद्यार्थ्यांनी रॅली काढत नागरिकांमध्ये जलसाक्षर जागृतीचा उपक्रम राबविला. एकीकडे सर्वत्र आज (शुक्रवार) जागतिक जलसाक्षरता दिन साजरा हाेत असताना दूसरीकडे मालेगाव महापालिकेची मुख्य जलवाहिनी फुटली. यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. यामुळे रस्त्याला नदीचे स्वरुप आले हाेते. (Maharashtra News)

उल्हासनगर मधील एस.एस.टी. कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि उल्हासनगर महानगरपालिका तर्फे नदी नीर नारी हि संकल्पना घेऊन 22 मार्च जागतिक जलसाक्षरता दिन साजरा करण्यात आला. आज सकाळी उल्हासनगर येथील व्हिनस चौकात पाणी बचाव या विषयावर एस एस टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाटय सादर केले. पाणी बचाव देश बचाव या घोषणा देत विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याशिवाय आज दिवसभरात 'आखरी कतरा'माहितीपट, पर्यावरण प्रेमींचा विचारसोहळा आणि जलबचत शपथग्रहण "जलोत्सव - २०२४" निमित्त आयोजन करण्यात आलं आहे, यावी एस एस टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी, पर्यावरण तज्ञ शशिकांत दायमा तसेच सामाजिक संस्था आणि पर्यावरण प्रेमीं नागरिक उपस्थित होते.

water logged in malegaon
Ranjitsinh Naik Nimbalkar : माढा लाेकसभा मतदारसंघाची माहिती नसणा-यांना दौरा करावा लागतो; रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा धैर्यशील माेहिते पाटलांना चिमटा

मालेगाव येथे जलवाहिनी फुटली

नाशिकच्या मालेगाव मधील शहराचे प्रवेशद्वार असलेल्या दरेगाव येथुन जाणाऱ्या महापालिकेची मुख्य जलवाहिनी काल पासून फुटल्याने त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे एकीकडे दुष्काळाचे सावट असताना फुटलेल्या जलवाहिनी कडे महानगरपालिकेचे लक्ष नाही का असा प्रश्न या भागातील नागरिकांनी केला आहे.

पालघर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने लक्ष द्यावे

पालघर : तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मागील तीन महिन्यांपासून गळती लागली आहे. या गळतीमुळे दिवसाला लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचा ठेका असलेल्या माँटो कार्लो कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हे घडल्याचा आाराेप स्थानिकांकडून हाेत आहे.

मुंबई वडोदरा दृतगती महामार्गाच्या उभारणीच्या वेळी डहाणूतील ऐना येथे जलवाहिनी दबली गेल्याने गळती लागली. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या गळतीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून दुर्लक्ष हाेत असल्याचेही स्थानिकांनी म्हटले. जिल्ह्यातील धरणांमध्ये कमी पाणीसाठा असताना दुसऱ्या बाजूला पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी हाेत असल्याने स्थानिक आक्रमक झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

water logged in malegaon
Code Of Conduct : युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिका-यासह रेल्वे स्टेशन मास्तर, व्यापा-यावर आचारसंहिता भंग गुन्हा दाखल; नांदेडला माेठा शस्त्रसाठा जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com