- नितीन पाटणकर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (delhi cm arvind kejriwal) यांना अटक करण्याची गरज नव्हती. केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर आहे असल्याचे मत काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण (congress leader prithviraj chavan) यांनी व्यक्त केले. दरम्यान अटक झाली असली तरी केजरीवाल मुख्यमंत्री म्हणून सरकार चालवू शकतात. ते मुख्यमंत्री म्हणून काम करू शकतात असेही आमदार चव्हाण यांनी नागपूर येथे साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra News)
दिल्ली येथील मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी रात्री अटक (enforcement directorate arrests delhi cm arvind kejriwal in iiquor scam) केली. त्याचे पडसाद कालपासून देशभरात उमटू लागले आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात देखील आपचे समर्थक, कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध नाेंदवत आहेत.
काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण (congress leader prithviraj chavan) यांनी केजरीवाल यांना अटक झाली असली तरी ते मुख्यमंत्री म्हणून सरकार चालवू शकतात असे नमूद केले. ही अटक बेकायदेशिर असल्याचेही चव्हाण यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी देखील अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध नाेंदविला. ते म्हणाले भाजप विराेधकांना विनाकारण कायद्याच्या कचाट्यात अडकवत आहे. इंडिया अलयान्स भाजपच्या दबावाला बळी पडणार नाही. आम्ही त्यांचा निश्चिंत मुकाबला करु असेही क्रास्टाे यांनी नमूद केले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.