- अक्षय बडवे
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (mahadev jankar) हे ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या भेटीनंतर तडकाफडकी निघून गेले. जानकर आणि पवार यांच्या भेटीत नेमकं काय घडलं हे समजू शकले नसले तरी माढा लाेकसभा मतदारसंघात (madha lok sabha election 2024) शरद पवार यांनी वेट अँड वॉच ही भूमिका? अवलंबली असल्याचे दिसून येते. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
उद्या (गुरुवार) महाविकास आघाडीची बैठक हाेणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (nationalist congress party sharadchandra pawar) आपल्या पक्षाचे उमेदवार ठरविण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठका घेत आहे. आज दिवसभरात पवार गटाचे उमेदवार निश्चित हाेतील असा अंदाज व्यक्त हाेत आहे.
माढा लाेकसभा मतदारसंघात महादेव जानकर हे निवडणुक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांनी आज सकाळी नियोजित वेळेपूर्वी अचानक शरद पवार यांची भेट घेतली. माढ्याची उमेदवारी राष्ट्रीय समाज पक्षाला देण्याची मागणी जानकर यांनी पवारांकडे केली.
माढ्यातुन निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे महादेव जानकर यांनी आज पवारांना पुन्हा एकदा सांगितले. दरम्यान पवार यांनी जानकंराना उमेदवारीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नाही असे समजते. त्यामुळेच ते तडकाफडकी माेदीबागमधून बाहेर पडले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
महादेव जानकर यांनी मंगळवारी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची भेट घेतली होती. जानकर यांना महायुतीमधून अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच जानकर शरद पवारांच्या भेटीस आले हाेते. परंतु येथेही त्यांची निराशा झाल्याचे समजते.
माढा लोकसभेसंदर्भात शरद पवारांची वेट अँड वॉच भूमिका?
माढा मतदारसंघात महायुतीने धैर्यशील मोहिते पाटील (dhairyasheel mohite patil) यांना उमेदवारी न दिल्याने मोहिते समर्थक नाराज आहेत. मोहिते- पाटील गटाकडून अद्याप शरद पवार यांच्याशी संपर्क केला गेला नाही.
हा गट शरद पवार यांच्या संपर्कात आल्यास पवार काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाबाबत पवार गटाचा देखील अद्याप कुठलाच निर्णय झालेला नाही.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.