लाेकसभा निवडणुकीची तारीख जाहीर हाेताच समाज माध्यमात 7 ची धूम; 7 टप्पे, 7तारा, 7 मे, 007 उदयनराजे

satara lok sabha constituency : सातारा येथे देखील निवडणुकीचा उत्साह दिसून आला. विशेषत: समाज माध्यमात हा उत्साह दांडगा हाेता.
007 viral in social media satara lok sabha constituency after declaration of election
007 viral in social media satara lok sabha constituency after declaration of electionSaam tv

Satara :

लाेकसभा निवडणुकीचा कार्यक्रम (lok sabha election dates announced today) आज (शनिवार) जाहीर हाेताच समाज माध्यमातून (social media) भाजप खासदार उदयनराजे भाेसले (bjp mp udayanraje bhosale) यांच्या समर्थकांमध्ये एक वेगळेच चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले. अनेकांनी 7 मे... 007 उदयनराजे अशी पाेस्ट व्हायरल करण्यास प्रारंभ केला. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज लोकसभेचे वेळापत्रक (Lok Sabha Election 2024 Schedule) जाहीर केले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी 7 टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले. यामध्ये महाराष्ट्रातील सातारा लाेकसभा मतदारसंघात (satara lok sabha constituency) 7 मे राेजी मतदान घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

007 viral in social media satara lok sabha constituency after declaration of election
Maharashtra Election 2024 : शरद पवारांना जुना राग काढायचा असेल, शाहू महाराजांना निवडणुकीला उभं करण्याचे षडयंत्र : संजय मंडलिक

लाेकसभा निवडणुकीची माहिती जनतेपर्यंत पाेहचल्यानंतर सातारा येथे देखील निवडणुकीचा उत्साह दिसून आला. विशेषत: समाज माध्यमात हा उत्साह दांडगा हाेता. सातारा लाेकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भाेसले हे निवडणुक लढवू इच्छितात. आज निवडणुकीची तारीख झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या विविध समाज माध्यमातील स्टेटसवर 7 मतदारांची 007 उदयनराजे असे ठेवले.

007 viral in social media satara lok sabha constituency after declaration of election
Sindhudurg Chipi Airport : सिंधुदुर्गहून बंगळुरू, हैदराबादसाठी विमान; चिपी विमानतळ सज्ज, जाणून घ्या फ्लाईटची वेळ, दिवस व तिकीट दर

अशी हाेती 7 ची धूम

7 टप्पे - लाेकसभा निवडणुकीचे सात टप्पे.

7तारा- सातारा

7 मे - सातारा लाेकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी मतदानाची तारीख 7 मे.

7 मतदारांची

007 उदयनराजे

खासदार उदयनराजे भाेसले यांचा आवडता क्रमांक 7 असल्याने अनेकांनी समाज माध्यमातून 7 मागितली.

Edited By : Siddharth Latkar

007 viral in social media satara lok sabha constituency after declaration of election
Maharashtra Election 2024 : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ पाेटनिवडणुकीची तारीख जाहीर, अमाेल मिटकरींचा उमेदवार ठरला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com