Maharashtra Election 2024 : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ पाेटनिवडणुकीची तारीख जाहीर, अमाेल मिटकरींचा उमेदवार ठरला

Amol Mitkari News : गेल्या २५ वर्षांपासून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात (कै.) गाेवर्धन शर्मा यांचे प्राबल्य ठरले आहे. मागील निवडणुकीत ते सहाव्यांदा विजयी झाले होते.
akola west assembly constituency by election date declared today
akola west assembly constituency by election date declared todaysaam tv
Published On

- अक्षय गवळी

Akola West Assembly Constituency By-Election Date Annouced :

लोकसभा निवडणुकीच्या (lok sabha election) धामधूमीतच राज्यातील अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (akola west assembly constituency by-election) होणार आहे. भाजप आमदार गोवर्धन शर्मा (bjp mla govardhan sharma) यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात शर्मा यांच्या कुटुंबातील उमेदवार असावा असे मत राष्ट्रीवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (ncp mla amol mitkari) यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

देशातील लोकसभा निवडणूक प्रक्रियेचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी स्वागत केले. मिटकरी म्हणाले अकोला पश्चिम मतदार संघासाठीही पोटनिवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. मागील सहा टर्म ते अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार राहिले आहेत. आता इथे महायुतीचा उमेदवार म्हणून दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या कुटुंबातच उमेदवारी द्यावी असेही त्यांनी नमूद केले.

akola west assembly constituency by election date declared today
Maharashtra Election 2024 : शरद पवारांना जुना राग काढायचा असेल, शाहू महाराजांना निवडणुकीला उभं करण्याचे षडयंत्र : संजय मंडलिक

नेमके कोण होते गोवर्धन शर्मा?

गोवर्धन शर्मा यांची ओळख ‘लालाजी‘ या आपुलकीच्या हाकेने व्हायची. नागरिकांच्या अनेक समस्या निराकरणासाठी कटिबद्ध आमदार शर्मा लोकांसाठी सदैव २४ तास उपलब्ध असत. कधीही जवळ मोबाईल न ठेवता लोकांची थेट आठवण ठेवणारे, अशी त्यांची ओळख होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विठ्ठल मंदिराच्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे तसेच अयोध्या येथील शीला पूजन १९९५ पासून 'श्रीराम जन्मभूमी' आंदोलनात सक्रिय सहभाग राहिलेला आहे. लोकनेते आणि राम भक्त म्हणून ते प्रसिद्ध होते.

दरम्यान गेल्या २५ वर्षांपासून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघावर दणदणीत विजयश्री प्राप्त करणारे शर्मा यांनी मागील निवडणुकीत म्हणजे सहाव्यांदा विजय मिळवला होता.

Edited By : Siddharth Latkar

akola west assembly constituency by election date declared today
Maharashtra Election 2024: मी संन्यास घेणार नाही; साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार का? उदयनराजे भोसले यांनी थेट सांगूनच टाकलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com