Maharashtra Election 2024: मी संन्यास घेणार नाही; साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार का? उदयनराजे भोसले यांनी थेट सांगूनच टाकलं

Udayanraje Bhosale On Satara Lok Sabha Election 2024 | महायुतीचे नेते अजित पवार हे वारंवार सातारा लाेकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे असल्याचा दावा करीत आहे. यामुळे उमेदवारी तिढा वाढला आहे.
BJP MP Udayanraje bhosale's Statement on Satara Lok Sabha Constituency
BJP MP Udayanraje bhosale's Statement on Satara Lok Sabha ConstituencySaam TV
Published On

Udayanraje Bhosale Latest Marathi News :

लाेकसभा निवडणुकीची तारीख (lok sabha election voting date 2024) आज (शनिवार) दुपारपर्यंत जाहीर हाेण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले (mp udayanraje bhosale) यांना साता-यात माध्यमांनी लाेकसभेच्या उमेदवारी (satara lok sabha constituency) विषयी छेडले असता उदयनराजेंनी महायुतीमध्ये (mahayuti) तीन पक्ष आहेत. प्रत्येकाला वाटतं त्यांना उमेदवारी मिळावी. ते रास्त आहे, जे ठरेल ते पाहूयात. परंतु मी संन्यास घेणार नाही असे राजेंनी स्पष्ट केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

सातारा येथील लाेकसभेची जागा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाकडे (Nationalist Congress Party) असल्याचा दावा महायुतीमधील राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) हे वारंवार करीत आहेत. कराड येथील दाै-यात देखील अजित पवार यांनी साता-याची जागा राष्ट्रवादीची असल्याचे म्हटले हाेते.

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा लाेकसभा निवडणुक ((lok sabha election 2024) लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी त्यांची तयारी सुरु आहे. लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या (bjp candidate list 2024) जाहीर करण्यात आल्या. यामध्ये सातारा लाेकसभा मतदारसंघाचा समावेश नव्हता. त्यामुळे अद्याप महायुतीत काेणत्या पक्षाकडे उमेदवारी जाणार याची उत्सुकता नागरिकांनी देखील लागली आहे. (Maharashtra lok sabha election 2024)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजप नेत्यांना घेराव

उदयनराजेंच्या नावाची घाेषणा अद्याप न झाल्याने साताऱ्यातील उदयनराजे समर्थक आणि मराठा समाज शुक्रवारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राजेंची उमेदवारी का जाहीर हाेत नाही असा सवालही कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांना घेराव घालून केला.

मी संन्यास घेणार नाही : उदयनराजे भाेसले

आज (शनिवार) उदयनराजे भाेसले यांना लाेकसभा उमेदवारीविषयी माध्यमांनी छेडले असता त्यांनी माझ्याकडे ट्रेन, बस आणि विमानाचे तिकीट आहे असा मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत. उमेदवारी बाबत सर्वांना वाटते त्यांना मिळावी. ते रास्त आहे. जे ठरेल ते पाहू. एवढचं सांगेन मी काही संन्यास घेणार नाही. दरम्यान उदयनराजे भाेसले यांनी आज पुन्हा एकदा त्यांची भूमिका स्पष्ट केल्याने सातारा लाेकसभा मतदारसंघात महायुतीकडून काेणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पाेहचली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com