flight from chipi to hyderabad cancelled
flight from chipi to hyderabad cancelled saam tv

Sindhudurg Chipi Airport : चिपी हैदराबाद विमान फेरी रद्द, टेक ऑफ घेण्याच्या तयारीत असताना नेमकं काय घडलं?

Chipi Airport Latest Marathi News : यापूर्वी सुरू असलेली अलायन्स कंपनीची व्यवस्था सुमार असल्यानेच प्रवाशांनी पाठ फिरवली. फ्लाय 91 कंपनीने प्रवाशांना चांगली सेवा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त हाेऊ लागली आहे.
Published on

- विनायक वंजारे

Sindhudurg News :

देशांतर्गत विमान सेवा देणाऱ्या फ्लाय 91 या विमान कंपनीची चिपी विमानतळावरून (chipi airport) हैद्राबादला (hyderabad) जाणारी विमानाची पहिलीच फेरी रद्द करण्याची नामुष्की कंपनी व्यवस्थापनावर आली. हवेच्या वाढत्या दाबामुळे विमान टेकऑफ घेऊ शकले नसल्याचे कारण व्यवस्थापनाकडून देण्यात आले आहे. हे कारण म्हणजे वेळ मारून नेण्याचा प्रकार असल्याची चर्चा आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चिपी विमानतळावरून हैद्राबादला (chipi airport to hyderabad) जाणारे विमान एक तासाहूनही अधिक वेळ 50 प्रवाशांना घेऊन टेक ऑफ घेण्याच्या तयारीत हाेते. विमान हवेत न झेपावता ते पायलटने माघारी घेत पॅसेंजर टर्मिनलसमोर आणून उभे केले.

flight from chipi to hyderabad cancelled
Sveep Awareness Program In Kolhapur : काेल्हापुरात 10 हजार 495 विद्यार्थ्यांंकडून मतदार जागृती, नॅशनल रेकॉर्डसह एशिया पॅसिफीक रेकॉर्डची नोंद (video)

त्यानंतर व्यवस्थापनाने प्रवाशांना खाली उतरवून फेरी रद्द केल्याचे जाहीर केले. हवेच्या वाढत्या दाबामुळे विमान टेकऑफ घेऊ शकले नसल्याचे कारण व्यवस्थापनाने प्रवाशांना दिले. दरम्यान नियोजित विमानाचा चुकीचा रूट व्यवस्थापनाकडून टाकण्यात आला होता. त्यामुळेच ऐनवेळी कंपनीला प्रवाशांनी भरलेले विमान रद्द करण्याची नामुष्की आली. (Maharashtra News)

flight from chipi to hyderabad cancelled
Dhule Crime News : मद्य वाहतुक प्रकरणी धुळे एलसीबीकडून तिघांना अटक, 36 लाख 89 हजारांचा मुद्देमाल जप्त

तांत्रिक अडचणीचे कारण देत विमान फेरी रद्द केल्याचे व्यवस्थापनाने जाहीर केले. मात्र अशाच प्रकारे विमानसेवा सुरू राहिली तर प्रवासी येणार तरी कसे? यापूर्वी सुरू असलेली अलायन्स कंपनीची व्यवस्था अशीच असल्यामुळे प्रवाशांनी पाठ फिरवली. त्यामुळे फ्लाय 91 या कंपनीने तरी प्रवाशांना चांगली सोय द्यावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

flight from chipi to hyderabad cancelled
Bharadi Devi Anganewadi : आई भराडी देवी शेतकऱ्यांवरील संकट दूर कर : एकनाथ शिंदे (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com