Bharadi Devi Anganewadi : आई भराडी देवी शेतकऱ्यांवरील संकट दूर कर : एकनाथ शिंदे (पाहा व्हिडिओ)

Malvan : भराडी देवीच्या यात्रोत्सवाला यंदा 10 ते 15 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. येथील मंदिर प्रशासनाने भाविकांना सुलभ दर्शनाची सोय केली आहे.
cm eknath shinde in malvan bharadi devi darshan anganewadi yatra
cm eknath shinde in malvan bharadi devi darshan anganewadi yatra saam tv
Published On

- विनायक वंजारे

Bharadi Devi Anganewadi :

शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर होऊ दे. सेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करून लोकसेवा व राज्याचा विकास सुरू आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी आज (शनिवार) मालवण येथे नमूद केले. आंगणेवाडी येथील भराडी मातेच्या जत्रोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बाेलत हाेते. (Maharashtra News)

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा आज मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. भाविकांसोबतच राजकीय नेत्यांची मांदीयाळी आज आंगणेवाडीत पाहायला मिळत आहे.

cm eknath shinde in malvan bharadi devi darshan anganewadi yatra
SSC Exam 2024 : दहावीचा पेपर सुरु असताना पाेरं शाळेच्या भितींवर चढली, कॉपी बहाद्दरांना केला पूरवठा; व्हिडिओ 'साम टीव्ही'च्या हाती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, रवींद्र फाटक, निलेश राणे आदींनी भराडी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी भाविकांशी संवाद साधत काेकणचा आणि राज्याचा विकास साधण्यासाठी सरकार वेळाेवेळी निर्णय घेत आहे.

दरम्यान मंदिर प्रशासनाने भाविकांना सुलभ दर्शनाची सोय केली आहे. यंदाच्या यात्रोत्सवाला 10 ते 15 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने यात्रा निर्विघ्न पार पडण्यासाठी सज्जता ठेवली आहे. मंदीर प्रशासनाकडून संपूर्ण मंदिराला फुलांच्या सजावटीसह आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

cm eknath shinde in malvan bharadi devi darshan anganewadi yatra
Success Story : पठ्ठ्यानं करुन दाखवलं! कोकणात कलिंगड शेतीतून मिळविले लाखाेंचे उत्पन्न; वाचा नाईकांची यशाेगाथा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com