Chetana Bhat: स्वप्नपूर्ती! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम चेतना भटने खरेदी केली आलिशान कार, म्हणाली...

Chetana Bhat Buy Car: चेतना भटने नुकताच आलिशान कार खरेदी केली. सोशल मीडियावर नव्या कारचे फोटो पोस्ट करत चेतना भटने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. तिच्या कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Chetana Bhat Buy Car
Chetana Bhat Buy CarSaam Tv

Chetana Bhat New Car Photos:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची (maharashtrachi hasya jatra) नेहमीच चर्चा होत असते. हा शो प्रेक्षकांच्या सर्वात जास्त पसंतीस उतरणारा शो आहे. या शोमधील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगळं स्थान निर्माण केले आहे. या शोच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहचलेली अभिनेत्री चेतना भट (Chetana Bhat) सध्या चर्चेत आली आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि कॉमेडीच्या माध्यमातून चेतना भट प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करते. चेतना भटने नुकताच आलिशान कार खरेदी केली. सोशल मीडियावर नव्या कारचे फोटो पोस्ट करत चेतना भटने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम चेतना भट सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना नवनवीन अपडेट्स देत असते. नुकताच तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत नवीन कार खरेदी केल्याची माहिती दिली. चेतनाने 'टाटा पंच' कार खरेदी केली. शोरुममध्येच कारची पूजा करताना आणि कारची चावी घेतानाचे नवऱ्यांसोबतचे फोटो चेतनाने पोस्ट केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'आज एक स्वप्नं पूर्ण झालं. गाडी घेतली.', असे लिहिले आहे. चेतना भटच्या पोस्टला पसंती देत चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

काही दिवसांपूर्वी चेतना भट 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमसोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. ऑस्ट्रेलियातील वेगवेगळ्या शहरामध्ये या टीमने खूप धम्माल केली. चेतना भटने देखील ऑस्ट्रेलियातून अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. ऑस्ट्रेलियातील रस्त्यावर कधी डान्स करताना, कधी समुद्र किनाऱ्यावर निवांत फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ चेतना भटने शेअर केले होते. तिच्या पोस्टला चाहत्यांनी पसंती दिली होती.

दरम्यान, चेतना भटचा नवरा मंदार चोळकर हा देखील मनोरंजनसृष्टीत काम करतो. मंदार प्रसिद्ध गीतकार आहे. मंदारने अनेक प्रसिद्ध चित्रपटांसाठी काम केले आहे. चेतना आणि मंदार दोघेही खूप चांगले काम करत असून करिअरमध्ये एक-एक यशाचा टप्पा ओलांडत आहेत. अशामध्ये या दोघांनी मेहनत करत आता कार खरेदी केली. घरामध्ये नवी कार आल्यामुळे दोघेही खूपच आनंदी आहेत.

Chetana Bhat Buy Car
Shah Rukh Khan सोबत IPL चा सामना का पाहत नाही Juhi Chawla?, स्वत:च केला खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com