Thalapathy Vijay

अभिनेते थलापती विजय हे तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार असून त्यांचा जन्म २२ जून १९७४ रोजी झाला. त्यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली आणि पुढे 'पूवे उनक्कागा', 'घिल्ली', 'थुप्पाक्की', 'मर्सल' आणि 'लिओ' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे प्रचंड लोकप्रिय झाले. चित्रपटांमधील यशासोबतच विजय यांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी २०२४ मध्ये तमिळगा वेत्री कषघम’ या पक्षाची स्थापना करून राजकारणात प्रवेश केला. २०२६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रणांगनात उतरले आहेत. शिक्षण, रोजगार, पारदर्शक प्रशासन आणि जनकल्याण या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला आहे. त्यांचा जन नायकन हा शेवटचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
Read More
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com