मोठी राजकीय घडामोड! राहुल गांधींची ताकद वाढली, भाजपविरोधातील लढ्यात आणखी एका पक्षाची साथ, नेमकं झालं काय?

TVK joins INDIA bloc : तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड! विजय यांच्या नेतृत्वाखालील TVK ने INDIA आघाडीच्या तामिळनाडूतील बैठकीत सहभाग घेतला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिक्कम टागोर यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
Rahul Gandhi
Rahul Gandhi saam tv
Published On: 

देशाच्या राजकारणात एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील 'तमिळगा वेट्री कळघम' (TVK) या पक्षाने 'INDIA' (इंडिया) आघाडीत प्रवेश केला आहे. तामिळनाडू काँग्रेस कमिटीचे (TNCC) अध्यक्ष माणिक्कम टागोर यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली. हा निर्णय इंडिया आघाडीसाठी ऐतिहासिक असल्याचा दावा केला आहे. यामुळे राहुल गांधींच्या भाजपविरोधातील लढ्याला आणखी ताकद मिळाल्याचे बोलले जात आहे.

तामिळनाडूत इंडिया आघाडीची ताकद वाढली

काँग्रेस नेते माणिक्कम टागोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, TVK पक्षाच्या प्रवेशामुळे तामिळनाडूमध्ये भाजप आणि आरएसएसविरोधी लढ्याला मोठी ताकद मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या धोरणांविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचा संकल्प या आघाडीने केला आहे. शनिवारी झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत काँग्रेस, TVK, सीपीआय(एम), सीपीआय, व्हीसीआर, एमडीएमके आणि आययूएमएल या पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत TVK चा आघाडीत समावेश करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

Rahul Gandhi
ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरचा ₹१५०० चा हप्ता 'या' दिवशी होणार जमा, वाचा मोठी अपडेट

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निदर्शने

या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जोरदार आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत आणि ईव्हीएम (EVM) संदर्भात अनियमितता असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी ज्ञानेश कुमार यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Rahul Gandhi
'दृश्यम' चित्रपट पाहिला, २००० किमी प्रवास केला अन्…; बापाला संपवल्याचा रचला बनाव, पण एका कॉलने सगळा प्लॅन उधळला

या मागणीसाठी १३, १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण तामिळनाडूत जिल्हा स्तरावर भव्य निदर्शने आणि मोर्चे काढले जाणार आहेत. १५ ऑक्टोबर रोजी चेन्नईसह सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये 'इंडिया' आघाडीतील सर्व घटका पक्षांच्या वतीने जोरदार विरोध प्रदर्शन करण्यात येईल, असे माणिक्कम टागोर यांनी स्पष्ट केले.

TVK च्या सक्रिय सहभागामुळे तामिळनाडूतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. आगामी काळात केंद्र सरकारविरोधातील हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com