

Ladki Bahin Yojana September 1500 Rs deposit date : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी खात्यात जमा झाल्यानंतर आता राज्यातील लाखो महिलांचे लक्ष सप्टेंबर महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याकडे लागले आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याचा हा हप्ता नवरात्री आणि दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच २५ ऑक्टोबरनंतर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित (DBT) केला जाण्याची शक्यता आहे. (Maharashtra Ladki Bahin Yojana next installment update)
मागील काही महिन्यांचा विचार करता, राज्य सरकारने विविध सणांचे औचित्य साधून लाडक्या बहिणींना आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर सरकारने वेळेवर सन्मान निधी वितरित करून महिलांना मोठे गिफ्ट दिले होते. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरच्या अखेरीस जमा होण्यास सुरुवात झाली होती आणि २ ऑक्टोबरपर्यंत बहुतांश महिलांच्या खात्यात तो जमा झाला. (Ladki Bahin Yojana status check online)
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात येणारे नवरात्र आणि दसरा या सणांच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकार सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरीत करण्याची तयारी करत आहे. राज्यातील सुमारे १ कोटी ६६ लाख पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे २५ ऑक्टोबरनंतर ही १५०० रुपयांची रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Majhi Ladki Bahin Yojana September installment date)
सध्या राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये या हप्त्याबाबत उत्सुकता आणि चर्चा पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या काळात मिळणाऱ्या या आर्थिक मदतीमुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून महिलांना पुन्हा एकदा आनंदाची भेट मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.