Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी नवे अर्ज आणि पुन्हाe-KYC सुरू? सरकारचा अत्यंत महत्त्वाचा खुलासा

Ladki Bahin Yojana fact check : लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज आणि e-KYC पुन्हा सुरू झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, महिला व बालविकास विभागाने अशा अनधिकृत लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
Ladki Bahin Yojana fact check
Ladki Bahin Yojana fact checkSaam TV
Published On: 

Ladki Bahin Yojana new application registration update : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे रखडलेले हप्ते लगेच मिळवण्यासाठी किंवा नवीन अर्ज भरण्यासाठी एका लिंकवर क्लिक करण्याचे मेसेज जर तुमच्याही व्हॉट्सॲपवर किंवा इन्स्टाग्रामवर येत असतील, तर सावधान! ही तुमची मोठी आर्थिक फसवणूक करण्याची चाल असू शकते. मागील काही दिवसांपासून इंस्ट्राग्राम अथवा व्हॉट्सअॅप यावर अशा मेसेज येत असल्याचे समोर आले. पण सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा कऱण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही लिंक्सवर क्लिक करू नये.

इन्स्टाग्रामवरील 'yojana.list' यासारख्या खात्यांवरून आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर लाडकी बहीण योजनेबाबत एक दिशाभूल करणारा मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये नवीन अर्ज भरणे आणि थकीत पैसे मिळवण्यासाठी एका लिंकवर क्लिक करून माहिती भरण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) केलेल्या 'फॅक्ट चेक'मध्ये (Fact Check) हा दावा पूर्णपणे खोटा आणि बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे.

Ladki Bahin Yojana fact check
आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

या संपूर्ण प्रकरणावर नागपूरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास घोडके यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत कोणताही नवीन बदल झाला असल्यास, त्याची कोणतीही अधिकृत माहिती आपल्या विभागाकडे आलेली नाही. सोशल मीडियावर किंवा रील्सद्वारे पसरवल्या जाणाऱ्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. महिला बालविकास विभागाकडून कोणतीही नवीन वेबसाईट किंवा नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही."

Ladki Bahin Yojana fact check
Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

चुकीच्या किंवा अनधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरल्यास किंवा ई-केवायसी (e-KYC) करण्याचा प्रयत्न केल्यास सायबर फसवणुकीचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा कैलास घोडके यांनी दिला. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आणि नवीन नोंदणीची मुदत आधीच संपलेली आहे. त्यामुळे सध्या कोणतीही नवीन नोंदणी सुरू नाही. अनधिकृत लिंकवर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती किंवा बँक खात्याचा ओटीपी (OTP) कोणालाही देऊ नका. जे पात्र लाभार्थी आहेत, त्यांना नियमानुसार 'डीबीटी' (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. यासाठी कोणतीही वेगळी लिंक भरण्याची गरज नसते, असे कैलास घोडके यांनी साम टीव्हीसोबत बोलताना सांगितले.

Ladki Bahin Yojana fact check
Solapur drought : १०० एकर जमिनीचा मालक, पण लग्नासाठी पोरगी मिळेना! सोलापूरमधील तरुणांची भीषण शोकांतिका

कुठे संपर्क साधावा?

नागरिकांनी अशा कोणत्याही व्हायरल मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये. योजनेबाबत काहीही अडचण किंवा शंका असल्यास 'आपले सरकार सेवा केंद्र', बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO) किंवा जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी. योजनेची सर्व अधिकृत माहिती केवळ https://ladakibahin.maharashtra.gov.in या सरकारच्या अधिकृत पोर्टलवरच उपलब्ध असून, अन्य कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com