आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

IAS Tukaram Mundhe, Maharashtra FDA : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शिशू आहारासाठी नवे कडक नियम लागू केले आहेत. बेबी फूडच्या पॅकेजिंगवर आईचे दूध सर्वोत्तम असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.
IAS Tukaram Mundhe, Maharashtra FDA
IAS Tukaram Mundhe, Maharashtra FDA
Published On: 

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा थेट 'बेबी फूड' (शिशू आहार) बनवणाऱ्या बड्या कंपन्यांकडे वळवला आहे. (Tukaram Mundhe new baby food packaging rules,) बाजारात मिळणाऱ्या डबाबंद दुधामुळे आणि आहाराच्या चुकीच्या जाहिरातींमुळे लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं तुकाराम मुंढे म्हणाले. मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी नवजात बालकांच्या आहाराबाबत कठोर आदेश लागू केला आहे. या नव्या निर्णयामुळे मुलांसाठी आहार बनवणाऱ्या उत्पादक, ब्रँड मालक आणि ई-कॉमर्स विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

६ महिन्यांपेक्षा लहान मुलांना केवळ आईचेच दूध मिळाले पाहिजे. आईचे दूध सर्वोत्तम, दुसरं काहीच नाही असे तुकाराम मुंढे म्हणाले. त्यांनी बेबी फूडच्या पॅकेजिंगवर 'आई आणि बाळाचा फोटो' वापरण्यावर थेट बंदी घातली आहे. त्यासोबतच, उत्पादनावर "आईचे दूध हेच शिशुसाठी सर्वोत्तम आहे" हे छापण्यासह ५ कडक नियमांची अंमलबजावणी अनिवार्य केली आहे. नियमांचे उल्लंघन करून जाहिराती करणाऱ्या किंवा डॉक्टरांच्या नावाने मोफत सॅम्पल्स वाटणाऱ्या कंपन्यांवर आता ३ ते १० लाख रुपयांचा दंड आणि थेट तुरुंगवासाची कारवाई होईल असा इशारा दिला.

IAS Tukaram Mundhe, Maharashtra FDA
Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

तुकाराम मुंढे म्हणाले, जेव्हा आपण 'सेव्ह फूड, सेव्ह ड्रग्स' म्हणतो, तेव्हा लोकांना अन्न आणि औषधे पूर्णपणे सुरक्षित आणि शुद्ध मिळायलाच हवीत. एफडीएने आतापर्यंत २२ नियमावली (Regulations) आणि ११ कडक आदेश जारी केले आहेत. यापूर्वी २२ महिने ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी शाळांच्या संदर्भात नियम केले होते. आता २ वर्षांखालील नवजात बालकांच्या आहाराबाबत राज्यभरात नवा आदेश लागू करण्यात आला आहे.

IAS Tukaram Mundhe, Maharashtra FDA
Solapur drought : १०० एकर जमिनीचा मालक, पण लग्नासाठी पोरगी मिळेना! सोलापूरमधील तरुणांची भीषण शोकांतिका

आत्ताच हा आदेश काढण्याची गरज का भासली?

बाजारात मिळणाऱ्या बेबी फूड आणि फॉर्म्युला मिल्कच्या पॅकेट्सवर 'आईचे दूध हेच शिशुसाठी सर्वोत्तम दूध आहे' ही कायदेशीर सूचना अनेक ठिकाणी छापलेलीच नव्हती, असे राज्यभरात एफडीएने केलेल्या तपासणीत आढळले. तसेच, राज्यातील स्तनपानाची आकडेवारी चिंताजनक रीतीने खाली येत आहे.

६ महिन्यांपेक्षा लहान मुलांना केवळ आईचे दूध देण्याचे प्रमाण ६५ टक्क्यांवरून घसरून ५८ टक्क्यांवर आले आहे. शहरी भागात केवळ ५२ टक्के माता स्तनपान करतात, तर ग्रामीण भागात हे प्रमाण ७५ टक्के आहे. बाळ जन्मल्यानंतर पहिल्या एका तासात त्याला आईचे दूध मिळणे अत्यंत गरजेचे असते. परंतु, महाराष्ट्रात दुर्दैवाने ५० टक्के माता जन्मल्यानंतर पहिल्या तासात बाळाला दूध पाजत नाहीत, असे मुंढे म्हणाले.

तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, या चुकीच्या आहारपद्धतीमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. सध्या १० ते १२ वर्षे वयोगटातील ३५ टक्के मुलांमध्ये उच्च रक्तदाब (High BP) आणि १० ते १९ वयोगटात १२ टक्के मुलांमध्ये मधुमेह (Diabetes) दिसून येत आहे.

IAS Tukaram Mundhe, Maharashtra FDA
Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

सर्व बेबी फूडच्या पॅकेजवर "आईचे दूध हेच शिशुसाठी सर्वोत्तम दूध आहे" हे ठळकपणे लिहावे लागेल.

डॉक्टरांच्या (Medical Prescription) सल्ल्यानुसारच याचा वापर करावा, असे छापावे लागेल.

हे अन्न आईच्या दुधाला पर्याय (Substitute) असू शकत नाही, असा स्पष्ट उल्लेख करावा लागेल.

हे अन्न ६ महिन्यांनंतर द्यायचा पूरक आहार (Supplementary Food) आहे, हे नमूद करावे लागेल.

पॅकेजवर आई आणि बाळाचा कोणताही फोटो वापरता येणार नाही.

याशिवाय, कंपन्यांना या उत्पादनांची आईच्या दुधाशी तुलना करून जाहिरात करता येणार नाही, मोफत नमुने (Free Samples) किंवा कूपन्स देता येणार नाहीत. डॉक्टर्स किंवा हॉस्पिटल्सनाही कोणत्याही नावाखाली या उत्पादनांचा प्रचार करता येणार नाही. नियम मोडल्यास ३ ते १० लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि कारावासाची शिक्षा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com