भाजपचा दणदणीत विजय, विधानसभा पोटनिवडणुकीच्या २ जागांवरही 'कमळ' फुललं

BJP Wins Nandigram And Rejinagar Assembly By-elections: पश्चिम बंगालच्या नंदीग्राम आणि रेजीनगर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा मोठा विजय. नंदीग्राममध्ये १ लाख २२ हजार ७५३, तर रेजीनगरमध्ये ७५ हजार ७४८ मतांच्या फरकाने भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली.
BJP BIG WIN IN WEST BENGAL BY-ELECTIONS
BJP BIG WIN IN WEST BENGAL BY-ELECTIONSsaam tv
Published On: 

पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीगार विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. नंदीग्राममध्ये भाजपच्या उमेदवार हासिरानी रथ यांनी 1 लाख 22 हजार 753 मतांच्या फरकाने विजय मिळवला. तर मुस्लिमबहुल रेजीनगर मतदारसंघात भाजपचे उमेदवार शाखारभ सरकार यांनी 75 हजार 748 मतांच्या फरकाने विजय मिळवला. रेजीनगर मतदारसंघात मुस्लिम समाजाची लोकसंख्या सुमारे 74 टक्के आहे. अशा परिस्थितीत या मतदारसंघात भाजपने मिळवलेला विजय राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जात आहे.

BJP BIG WIN IN WEST BENGAL BY-ELECTIONS
CJP च्या आंदोलनापूर्वीच पोलिसांची धरपकड; पदाधिकाऱ्यांना पहाटे घेतले ताब्यात

दरम्यान दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये 6 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होते. नंदीग्रामची जागा मुख्यमंत्री सुवेधु अधिकारी यांनी तर रेजी नगरची जागा आम आदमी उन्नयन पार्टीचे प्रमुख हुमायुन कबीर यांनी सोडल्यानंतर रिक्त झाली होती, त्यामुळे या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली.

BJP BIG WIN IN WEST BENGAL BY-ELECTIONS
माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या; FIR दाखल करण्याचे कोर्टाने दिले आदेश

तमिळनाडूत थलपती विजय यांचा जलवा कायम

पश्चिम बंगालप्रमाणेच तमिळनाडूमध्येही पोटनिवडणुकीत राजकीय पक्षांनी आपली ताकद दाखवली. राज्यातील धारापुरम आणि मदुरंतकम या दोन जागांवर विजय थलपती यांच्या TVK पक्षाने दमदार कामगिरी केलीय. AIADMK गटातून बाहेर पडलेल्या या जागेवर TVK च्या उमेदवार पी. सत्यबामा यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांनी ९ हजारांहून अधिक मतांनी बाजी मारली. या निवडणुकीत डीएमकेच्या सुगन्या एस. या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com