तमिळ चित्रपटसृष्टी आणि संगीतप्रेमींसाठी हा आठवडा दु: खद ठरला आहे. ज्येष्ठ संगीतकार देवा यांच्या निधनानंतर काही दिवसांतच प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णराज रामासामी यांनीही जगाचा निरोप घेतला. वयाच्या 75 व्या वर्षी चेन्नई येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, कृष्णराज यांच्या निधनामुळे तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कृष्णराज यांच्या निधनाची बातमी गुरुवारी समोर आली. यापूर्वी १७ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ संगीतकार देवा यांचे निधन झाले होते. देवा आणि कृष्णराज यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यांच्या जोडीने तमिळ संगीतप्रेमींना अनेक लोकप्रिय गाणी दिली. दोघांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध होते.
कृष्णराज यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी, सेलम जिल्ह्यातील वेम्बडितालम येथे नेण्यात येणार आहे. गायिका अनुराधा श्रीराम यांनी कृष्णराज यांच्या चेन्नईतील निवासस्थानी जाऊन तयांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी कुटुंबीयांशी संवाद साधताना त्यांना अश्रू अनावर झाले.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी कृष्णराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी 'एक्स'वर श्रद्धांजली वाहिली. कृष्णराज यांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले. कृष्णराज यांचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि उत्साहपूर्ण गाण्यांनी चाहत्यांच्या मनात विशेष स्थानी निर्माण केले होते. त्यांच्या निधनामुळे तमिळ चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाल्याची भावना विजय यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी कृष्णराज यांच्या कुटुंबियांसाह मित्रपरिवार, सहकारी आणि संगीतप्रेमींचे सांत्वन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.