Diljit Dosanjh: मोठी बातमी! दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला पोलिसांचा स्पष्ट नकार, परवानगी नाकारताना सांगितली ३ कारणं

Diljit Dosanjh Delhi Concert: दिलजीत दोसांजच्या ३० ऑक्टोबरच्या दिल्ली कॉन्सर्टला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी ३ महत्त्वाची कारणे देत कॉन्सर्ट करण्यास नकार दिला आहे.
Diljit Dosanjh
Diljit DosanjhSaam Tv
Published On: 

Diljit Dosanjh Delhi Concert: पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांजच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिलजीत दोसांजचा बहुचर्चित ‘ऑरा इंडिया टूर’ (Aurra India Tour) ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दिल्लीपासून सुरू होणार होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणाऱ्या या कॉन्सर्टला परवानगी का नाकारण्यात आली आणि आता या कार्यक्रमाचं पुढे काय होणार, असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

‘एचटी सिटी’च्या वृत्तानुसार, दिल्ली पोलीस उपायुक्तांनी ‘बुकमायशो’ला पत्र पाठवलं आहे. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या अर्जाचा संदर्भ देत, ३० ऑक्टोबर रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित करण्यात येणाऱ्या दिलजीत दोसांजच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्याचं या पत्रात नमूद करण्यात आल्याची माहिती आहे. सुरक्षेच्या दृष्टीने असलेले धोके, सणासुदीच्या काळात आवश्यक असलेली सुरक्षा व्यवस्था आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी लक्षात घेऊन पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.

Diljit Dosanjh
Aadi Anant: आजोबा-नातवाच्या नात्याचा हळवा प्रवास; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडे यांच्या ‘आदि अनंत’चा ट्रेलर रिलीज

तिकिटांची किंमत किती?

दिलजीत दोसांज जवळपास दोन वर्षांनंतर भारतात शो करणार असल्याने त्याच्या ‘ऑरा इंडिया टूर’ची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, या शोच्या तिकिटांची किंमत जास्तीत जास्त १८ हजार रुपये आहे. दिल्लीतील कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे तिकीट बुक केलेल्या चाहत्यांच्या कार्यक्रम रद्द झाल्यास तिकिटांचे पैसे परत मिळणार का, तसेच शो दुसऱ्या दिवशी आयोजित केला जाणार का असे प्रश्न पडले आहेत.

Diljit Dosanjh
Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणातून आणखी दोन आरोपी ताब्यात

दिलजीत दोसांजचा भारत दौरा कोणत्या शहरांत होणार?

दिल्लीतील कार्यक्रम रद्द झाला असला तरी त्याचे आगामी कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

इंदूर: १५ नोव्हेंबर २०२६

अहमदाबाद: २१ नोव्हेंबर २०२६

मुंबई: २७ नोव्हेंबर २०२६

बेंगळुरू: २९ नोव्हेंबर २०२६

लखनौ: ५ डिसेंबर २०२६

याशिवाय चंदीगडमध्येही दिलजीतचा कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com