Aadi Anant: आजोबा-नातवाच्या नात्याचा हळवा प्रवास; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडे यांच्या ‘आदि अनंत’चा ट्रेलर रिलीज

Aadi Anant: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांची जोडी लवकरच ‘आदि अनंत’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आदि अनंत’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
Aadi Anant
Aadi AnantSaam Tv
Published On: 

Aadi Anant: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांची जोडी लवकरच ‘आदि अनंत’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजोबा आणि नातवाच्या अनोख्या नात्याची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे, या ट्रेलरचे अनावरण चित्रपटातील कलाकारांच्या कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आले. पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत हा कौटुंबिक चित्रपट येत्या १२ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

आजोबा-नातवाच्या नात्यातील गोडवा उलगडणार

‘आदि अनंत’च्या ट्रेलरमध्ये आजोबा आणि नातवामधील गमतीजमती, हट्ट, मिश्किल संवाद आणि भावनिक क्षणांची झलक पाहायला मिळते. दोन वेगवेगळ्या पिढ्यांमधील विचारांचा फरक, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न आणि नात्यातील आपुलकी या गोष्टी चित्रपटातून मांडण्यात आल्या आहेत. प्रत्येक कुटुंबात आजी-आजोबा आणि नातवंडांमध्ये अनेक मजेशीर प्रसंग घडत असतात. कधी नातवंडांचे हट्ट पूर्ण करताना आजी-आजोबांची होणारी धावपळ, तर कधी त्यांच्यातील भावनिक जवळीक अशा अनुभवांची आठवण हा चित्रपट करून देणार आहे. मनोरंजनासोबतच कुटुंबातील नात्यांचे महत्त्व या ट्रेलरमधून दिसते.

Aadi Anant
Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणातून आणखी दोन आरोपी ताब्यात

दिग्दर्शक महेश लिमये म्हणतात, 'आजोबा आणि नातवाचं नातं पडद्यावर मांडताना मला त्यातील सहजता आणि त्यांच्यात घडणारे छोटे छोटे प्रसंग महत्त्वाचे वाटले. या नात्यात कधी गंमत असते, कधी मतभेद असतात, तर कधी शब्दांत न मावणारी जवळीक असते. ‘आदि अनंत’मधून हे सगळे पैलू प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट बघताना प्रेक्षकांना त्यांच्या घरातल्या माणसांची आठवण नक्की येईल. यात आजोबा - नातवाचं नातं असले तरीही हा प्रत्येक नात्याचा चित्रपट आहे, जो संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा.’’

Aadi Anant
Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड; तीन आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी

दमदार कलाकारांची फळी

‘आदि अनंत’मध्ये अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यासोबत सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरु ठाकूर यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांनी लिहिले आहेत. पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. रविंद्र औटी आणि दर्शन शाह सहनिर्माते आहेत. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांची ही भावनिक आणि मनोरंजक गोष्ट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com