प्रत्येक आमदाराला 60-70 कोटींची ऑफर; 6 महिन्यांपूर्वी स्थापन झालेलं सरकार कोसळणार? 13 तारखेला मोठं काहीतरी घडणार

Tamil Nadu Political Crisis Cm Vijay Government Faces Collapse Threat: तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या सरकारवर संकटाचे ढग गडद असून प्रत्येक आमदाराला 60 ते 70 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Big Political Twist in Tamil Nadu
Big Political Twist in Tamil Nadusaam tv
Published On: 

तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. थलपती विजय यांच्या सरकारवर सध्या संकटाचे ढग गडद झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. डीएमकेची सत्ता उलथवत मुख्यमंत्रीपदाला गवसणी घालणाऱ्या विजय यांचे आमदार आता सोडून जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बुधवारी विजय यांनी पक्षाच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक बोलावली होती. तब्बल 2 तास 45 मिनिटे चाललेल्या या बैठकीत विजय यांनी प्रत्येक आमदाराशी संवाद साधला. या बैठकीनंतर 60 ते 70 कोटी रुपयांच्या कथित ऑफर आणि 'बिग बॉस'च्या कन्फेशन रूमप्रमाणे झालेल्या चर्चेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Big Political Twist in Tamil Nadu
प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात तणाव; राजेंद्र शिंदेंच्या अटकेसाठी ठाणे जाम

बैठकीनंतर विजय सरकार पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकार अस्थिर करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांना सुत्रांकडून कळाले. त्यामुळे आमदारांनी सतर्क राहावे आणि विरोधी पक्षांकडून मिळणाऱ्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये अशा सूचना विजय यांनी दिल्याचे समजते. तसेच आमदारांनी आपपल्या मतदारसंघातील समस्या सोडवण्यावर भर द्यावा आणि जनतेमध्य सक्रिय राहावे, असेही त्यांनी सांगितले. पक्षातील शिस्त आणि एकजूट कायम ठेवण्यावरही विशेष भर देण्यात आला. सरकार मजबूतपणे चालत असल्याचे विजय यांच्याकडून सांगण्यात आले असले तरीही 13 नोव्हेंबर ही तारीख आणि आमदारांना दिलेल्या सूचनांमुळे तमिळनाडूच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Big Political Twist in Tamil Nadu
संमतीने ठेवलेले शरीरसंबंध ब्रेकअपनंतर बलात्कार ठरवता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

विजय यांच्यासाठी 13 नोव्हेंबर ही तारीख महत्त्वाची का?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, 13 नोव्हेंबरपूर्वी आमदारांची पक्षाप्रती निष्ठा अधिक मजबूत करणे हा बैठकीमागील प्रमुख उद्देश होता.

13 मे रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करून सहा महिने पूर्ण होत असल्याने 13 नोव्हेंबर ही तारीख महत्त्वाची मानली जात आहे.

बैठकीत काही आमदारांनीही या तारखेचा उल्लेख केला.

एका आमदाराच्या माहितीनुसार, 13 नोव्हेंबरनंतर कधीही पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणला जाऊ शकतो, असे त्यांना सांगण्यात आले.

त्यामुळे आगामी काळात पक्षातील आमदारांची एकजूट टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान विजय यांच्यासमोर असणार आहे.

Big Political Twist in Tamil Nadu
UP Elections : विधानसभा निवडणुकीआधी पहिली ठिणगी; भाजपला पर्याय तिसऱ्या आघाडीचा; मुख्यमंत्रि‍पदाचा चेहराही ठरला

आमदारांना आमिषाला बळी न पडण्याच्या सूचना

बैठकीत विजय यांनी आमदारांना सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न अजून थांबले नसल्याचे सांगितल्याची माहिती आहे. सूत्रांनी त्यांना दिलेल्या माहितीनुसार, डीएमके आणि एआयएडीएमकेकडून दिल्लीतील काही राजकीय ताकदीच्या पाठिंब्याने सत्ताधारी पक्षाचे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे.

विजय यांची आमदारांसोबतची बैठक 'बिग बॉस'च्या कन्फेशन रूमसारखी!

या बैठकीत विजय यांनी आमदारांशी संवाद साधण्याची पद्धतही चर्चेचा विषय ठरली. त्यांनी बहुतांश आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. एका आमदाराने या भेटीची तुलना लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस'मधील कन्फेशन रूमशी केली.

'बिग बॉस'मध्ये स्पर्धकांना एकेक करून कन्फेशन रूममध्ये बोलावले जाते. त्याचप्रमाणे विजय यांनीही आमदारांना स्वतंत्रपणे भेटून त्यांच्याशी संवाद साधला. एका आमदाराने दिलेल्या माहितीनुसार, विजय यांनी शोचा थेट उल्लेख केला नसला, तरी संपूर्ण बैठक 'बिग बॉस'सारखीच वाटत होती. जणू प्रत्येकावर स्वतंत्रपणे लक्ष ठेवले जात असल्याची भावना होती, असेही या आमदाराने सांगितले.

आमदारांना 60 ते 70 कोटी रुपयांची ऑफर? मंत्र्यांचा गंभीर आरोप

विजय सरकारमधील मंत्री सीटी निर्मल कुमार यांनी अलीकडेच मोठा आरोप केला होता. डीएमकेकडून सत्ताधारी पक्षातील आमदारांशी संपर्क साधण्यात आला असून, त्यांना प्रत्येकी 60 ते 70 कोटी रुपयांपर्यंतची ऑफर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.