प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात तणाव; राजेंद्र शिंदेंच्या अटकेसाठी ठाणे जाम

Pradeep Purnekar Case: प्रदीप पूर्णकर यांच्या हत्येनंतर ठाण्यात तणाव कायम आहे. कार्यकर्ते मुख्य आरोपींच्या अटकेची मागणी करत असून, राजेंद्र शिंदे यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, पीडित कुटुंबाने या प्रकरणातील पुढील कारवाईसाठी पोलिसांकडे धाव घेतलीय.
Pradeep Purnekar murder case latest news from Thane
Pradeep Purnekar murder case latest news from Thanesaam tv
Published On: 
Summary
  • प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींच्या अटकेची मागणी

  • राजेंद्र शिंदे यांच्या अटकेसाठी ठाण्यात आंदोलन

  • प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठले

ठाण्यात प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येनंतरही तणाव कायम आहे. पूर्णेकरांच्या हत्येतील मुख्य आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी कार्यकर्ते पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेत. तर दुसरीकडे, पुरावे सादर करूनही मुख्य सूत्रधारांना अटक होत नसल्यानं पूर्णेकर कुटुंबीयांनी थेट पोलीस स्टेशन गाठलंय. एका रात्रीत ठाण्यात कशा घडामोडी घडल्यात?. पाहूयात या रिपोर्टमधून.

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याकांडाला महिना होत आला, याप्रकरणी पुरावे असूनही माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदेंना अटक न झाल्यानं पुर्णेकर कुटुंबिय आणि समर्थकांनी काल ठाण्यात जोरदार आंदोलन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेर आंदोलन करण्यासाठी गेलेल्या प्रदिप पूर्णेकरांच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर तर वातावरण आणखीनच पेटलं. नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये पुर्णेकरांच्या मुलानं आणि पत्नीनं पोलिसांना जाब विचारत ठिय्या दिला.

Pradeep Purnekar murder case latest news from Thane
MLC Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत धक्कादायक निकाल; ठाकरे गटाच्या उमेदवारासह 41 पैकी 39 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

एकीकडे नौपाड्यात पुर्णेकर कुटुंबियांनी ठिय्या दिल्यानंतर रात्री पुर्णेकरांच्या समर्थकांनी ज्या मानपाड्यात पुर्णेकरांची हत्या झाली त्याच मानपाड्यात जोरदार आंदोलन केलं. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी 24X7 अविरत सुरु असणारा महाराष्ट्र गुजरातला जोडणारा महत्वाचा घोडबंदर रोड बंद पाडला. घोडबंदर रोडवर ट्राफिक जाम करतांना पुर्णेकर समर्थकांनी रस्त्यावरच पोरांबाळासह ठिय्या मांडला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी टायर जाळून मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदेंना अटक करण्याची मागणी केली.

Pradeep Purnekar murder case latest news from Thane
Maharashtra Politics: ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदेसेनेत गेलेल्या ६ नेत्यांची खासदारकी जाणार? दिवाळीनंतर सुप्रीम कोर्टात लागणार निकाल

घोडबंदर रोड रोखल्यामुळे मुलुंड पासून फाऊंटन हॉटेलपर्यंत वाहतूक ठप्प झाली.. पोलिसांची अतिरिक्त कुमक देखिल याच वाहतूक कोंडीत अडकून पडली. सोबतच जेष्ठ नागरिकांना आणि वृद्ध प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. चिघळलेली संपुर्ण परिस्थिती पाहता घटनास्थळी अँडिशनल सीपी अशोक दुधे पोहचले त्यांनी पुर्णेकर समर्थकांसोबत चर्चेचा पर्यत्न केला. याच वेळी मध्यरात्री साडेतीन वाजता पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवत परिसरातील लाईट बंद करुन रस्ता अडवणाऱ्या लोकांना बाजूला करत वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर काय घडलं पाहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com