Big Action: मुख्यमंत्र्यांकडून मोठी कारवाई! कारागृह उपअधीक्षक सेवेतून बडतर्फ, १७ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

Big Action by Tamil Nadu CM Vijay thalapathy: तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय यांनी मोठी कारवाई केली. त्यांनी कारागृह उपअधीक्षकांना सेवेतून बडतर्फ केले.
Big Action: मुख्यमंत्र्यांकडून मोठी कारवाई!  कारागृह उपअधीक्षक सेवेतून बडतर्फ, १७ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन
Big Action by Tamil Nadu CM Vijay thalapathySaam tv
Published On: 
  • थेनी कारागृहातून कैदी पळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई

  • तामिळनाडूमध्ये कारागृह उपअधीक्षक सेवेतून बडतर्फ

  • कैदी फरार प्रकरणात १७ कारागृह कर्मचाऱ्यांचे निलंबन

  • तामिळनाडूतील कारागृह प्रशासनात मोठे फेरबदल

तामिळनाडूतील थेनी जिल्हा कारागृहातून १७ कैदी पळून गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आता मुख्यमंत्री थलपती विजय यांनी मोठी कारवाई केली. मुख्यमंत्र्यांनी कारागृह उपअधीक्षकांना तडकाफडकी सेवेतून बडतर्फ केले. तर कारागृहातील १७ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. या सर्वांविरोधात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

तामिळनाडूतील २ कारागृहातील कैदी पळून जाण्याच्या घटनांनंतर मुख्यमंत्र्यांनी मोठी कारवाई केली. राज्य सरकारने कारागृह प्रशासनात मोठ्या बदल्या केल्या आहेत. बडतर्फ करण्यात आलेले कारागृह उपअधीक्षक एन. रामलिंगम हे ऑगस्ट २०२४ पासून थेनी कारागृहात कार्यरत होते. कारागृह प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेच्या देखरेखीत निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

Big Action: मुख्यमंत्र्यांकडून मोठी कारवाई!  कारागृह उपअधीक्षक सेवेतून बडतर्फ, १७ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन
Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

मुख्यमंत्री थलापती विजय यांनी कारागृहातून कैदी पळाल्याच्या घटनेनंतर आता राज्यभरातील सर्व कारागृहांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे आणि कडक पाळत ठेवण्याचे निर्देश दिलेत. गुरूवारी सरकारने तुरूंग आणि सुधार सेवा विभागाचे पोलिस महासंचालक डॉ. संदीप राय राठोड यांची बदली केली.

Big Action: मुख्यमंत्र्यांकडून मोठी कारवाई!  कारागृह उपअधीक्षक सेवेतून बडतर्फ, १७ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन
Assam Jail Shocking : ३१ तुरुंगांमध्ये ४ महिन्यांत २२६ कैदी एड्सबाधित, राज्यात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.