Assam Jail Shocking : ३१ तुरुंगांमध्ये ४ महिन्यांत २२६ कैदी एड्सबाधित, राज्यात खळबळ

226 prisoners test HIV positive across 31 Assam jails in four months : आरोग्य आणि कारागृह अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जवळपास ९५ टक्के कैदी हे नशेच्या औषधांचे इंजेक्शन घेतल्याने एचआयव्ही पॉझिटिव्ह झाले आहेत.
HIV Scare in Assam Jails 226 Prisoners Test Positive During Screening Drive
HIV Scare in Assam Jails 226 Prisoners Test Positive During Screening Drivesaam Tv
Published On

आसाममधील (Assam) ३१ कारागृहांमध्ये जवळपास २२६ कैदी एचआयव्हीबाधित आढळून आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. आसाम राज्य एड्स नियंत्रण समितीच्या (ASACS) वतीने राबवलेल्या विशेष स्क्रीनिंग मोहिमेतून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी गंभीर दखल घेऊन सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

चार महिन्यांत २२६ कैदी एचआयव्हीबाधित

एड्स नियंत्रण समितीच्या (ASACS) वतीने एप्रिल ते जुलै दरम्यान स्क्रीनिंग करण्यात आली. राज्यातील ३१ कारागृहांत ही तपासणी मोहीम राबवली गेली. त्यात २२६ कैद्यांना एड्सची लागण झाल्याचे निदान झाले. आरोग्य विभाग आणि तुरुंग अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नशेच्या औषधांचे इंजेक्शन घेतल्याने जवळपास ९५ टक्के कैदी एचआयव्हीबाधित झाले आहेत. तुरुंगात येण्याआधीच काही कैदी बाधित झाले होते. तुरुंगातील तपासणीत ते पॉझिटिव्ह आढळून आले.

बाधित कैद्यांना ART थेरपी

२२६ पैकी २०२ बाधित कैद्यांना एंटीरेट्रोव्हायरल थेरेपी (ART) देण्यात येत आहे. कारागृह सुरक्षिततेच्या नियमांमुळं एआरटी पथकांनाच तुरुंगात पाचारण करण्यात येत असून, औषधं आणि काउंसलिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, अलीकडेच आसामच्या श्रीभूमी जिल्हा कारागृहात (District Jail) एका महिलेसह ११ कैदी एचआयव्हीबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. या कारागृहाची क्षमता १८७ कैद्यांची आहे. मात्र, तेथे ४४५ कैदी आहेत. बहुतांश एचआयव्हीबाधित कैदी हे एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत अटक करण्यात आलेले आहेत.

HIV Scare in Assam Jails 226 Prisoners Test Positive During Screening Drive
Sambhajingar: डेटिंग ॲपवर तरुणांना जाळ्यात अडकवायचं, आलिशान बारमध्ये न्यायचं नंतर...; संभाजीनगरमध्ये 'लेडीज गँग'चा पर्दाफाश

काही कैद्यांची प्रकृती गंभीर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही कैद्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना सिलचर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे, अशी माहिती कारागृह प्रभारी मॅजिस्ट्रेट अन्वेषा खेरसा यांनी दिली. सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली आहे, असे मुख्यमंत्री हिमंत बिसवा सरमा यांनी सांगितले. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात येईल. तुरुंगात असताना एखादा कैदी कोणत्या कारणांमुळं बाधित झाला, याची तपासणी होईल. तर बाधित कैद्याची योग्य तपासणी आणि त्याला चांगले उपचार मिळतील, हे सुनिश्चित केले जाईल, असेही ते म्हणाले.

HIV Scare in Assam Jails 226 Prisoners Test Positive During Screening Drive
CJP आणि अभिजीत दिपकेंबाबत सोनम वांगचुक यांनी केला गौप्यस्फोट; दीपकेंच्या मनातील बाब केली उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com