Thalapathy Vijay: स्वातंत्र्यदिन सोहळ्यात थलापती विजय यांच्या आई-वडिलांसोबत दिसली त्रिशा; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Thalapathy Vijay: स्वातंत्र्यदिन सोहळ्यात अभिनेत्री त्रिशा कृष्णन विजय यांच्या आई-वडिलांसोबत बसलेली दिसली. या व्हिडिओनंतर विजय-त्रिशाच्या नात्याबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
Thalapathy Vijay
Thalapathy Vijayएोोस ऊन
Published On

Thalapathy Vijay: चेन्नईतील फोर्ट सेंट जॉर्ज येथे स्वातंत्र्यदिनाचा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सुपरस्टार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपथी विजय उपस्थित होते. विजय यांनी यावेळी राष्ट्रध्वज फडकावला. या सोहळ्यात अभिनेत्री त्रिशा कृष्णनची उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे, त्रिशा विजय यांच्या आई-वडिलांसोबत बसलेली दिसली. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने चेन्नईतील स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्रिशा कृष्णन विजय यांचे वडील एस.ए. चंद्रशेखर आणि आई शोभा चंद्रशेखर यांच्यासोबत बसलेली दिसत आहे. या खास प्रसंगी त्रिशाने पिवळ्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचा ब्लाउज परिधान केला होता. केसांचा अंबाडा बांधून त्यावर गजरा माळल्याने तिचा लूक लक्षवेधी ठरला. कार्यक्रमादरम्यान ती उत्साही दिसत होती.

Thalapathy Vijay
Poet Death News: मराठी साहित्याचा आधारस्तंभ हरपला; महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी काळाच्या पडद्याआड, साहित्यविश्वात शोककळा

विजय-त्रिशाच्या नात्याबाबत पुन्हा चर्चा

थलपथी विजय आणि त्रिशा कृष्णन यांच्या नात्याबाबतच्या चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही ते अनेकदा एकत्र दिसले आहेत. यापूर्वी त्रिशा विजय यांच्या शपथविधी सोहळ्यालाही उपस्थित होती.

Thalapathy Vijay
Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; अस्थमाच्या झटक्याने वयाच्या ४६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काही काळापूर्वी विजय यांच्या वैवाहिक आयुष्याबाबतही विविध चर्चा रंगल्या होत्या. एका विवाह सोहळ्याच्या रिसेप्शनमध्ये विजय आणि त्रिशा एकत्र आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबाबत पुन्हा तर्क-वितर्क सुरू झाले होते. तसेच अभिनेत्री कीर्ती सुरेशच्या लग्नालाही दोघे उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, विजय किंवा त्रिशाने त्यांच्या नात्याबाबतच्या अफवांवर आजपर्यंत कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.

त्रिशाचे आगामी प्रोजेक्ट

दरम्यान, विजय यांनी अभिनय क्षेत्रातून बाजूला होत राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे, त्रिशा कृष्णन सध्या आपल्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. ती 'करुप्पु' या चित्रपटात दिसली असून तिचा आगामी 'विश्वंभर' हा चित्रपट चिरंजीवी यांच्यासोबत आहे. याशिवाय मोहनलाल यांच्यासोबतही ती 'राम' या मल्याळम चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com