Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; अस्थमाच्या झटक्याने वयाच्या ४६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Actress Death: ‘ऑल दॅट’ फेम अभिनेत्री ख्रिस्टी नोइंग्ज यांचं वयाच्या ४६व्या वर्षी निधन झालं. दम्याचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Christy Knowings passes away
Christy Knowings passes awaySaam Tv
Published On

Actress Death: निकेलोडियनच्या लोकप्रिय ‘ऑल दॅट’ या स्केच कॉमेडी शोमधून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री ख्रिस्टी नोइंग्ज यांचं वयाच्या ४६व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, ख्रिस्टी नोइंग्ज यांना दम्याचा तीव्र झटका आल्याने ७ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लॉस एंजेलिस परिसरातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान ११ ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकाने दिली आहे.

Christy Knowings passes away
Actress Cancer: 'मला वाटलं मी मरणार...'; स्टेज ४ कॅन्सरचं निदान झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव

'ऑल दॅट'मधून मिळाली लोकप्रियता

ख्रिस्टी नोइंग्ज यांनी १९९७ पासून निकेलोडियनच्या ‘ऑल दॅट’ या कार्यक्रमात काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी या लोकप्रिय स्केच कॉमेडी शोच्या ३० हून अधिक भागांमध्ये भूमिका साकारल्या. १९९९ मध्ये त्या या कार्यक्रमात शेवटच्या वेळेस दिसल्या होत्या. ‘ऑल दॅट’ हा कार्यक्रम १९९४ मध्ये सुरू झाला आणि २००५ पर्यंत प्रसारित झाला. या शोचे एकूण १० सीझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले. अमांडा बायन्स, केल मिचेल आणि निक कॅनन यांसारख्या कलाकारांनीही या कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवली.

Christy Knowings passes away
Delhi Bomb Threat: दिल्लीमध्ये हाय अलर्ट! स्वातंत्र्य दिनाच्या आदल्यादिवशी हायकोर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी

चित्रपट आणि 'सेसमी स्ट्रीट'मध्येही काम

ख्रिस्टी नोइंग्ज यांनी २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मदर अँड चाइल्ड’ या चित्रपटातही काम केलं होतं. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी त्यांनी लेखनही केलं होतं. त्यानंतर २००९ ते २०११ या कालावधीत त्या ‘सेसमी स्ट्रीट’च्या तीन भागांमध्ये झळकल्या होत्या. हे त्यांच्या कारकिर्दीतील अलीकडील कामांपैकी एक होतं. ‘ऑल दॅट’च्या यशानंतर ‘केनन अँड केल’, ‘द अमांडा शो’ आणि ‘द निक कॅनन शो’ यांसारखे स्पिन-ऑफ कार्यक्रमही त्यांनी तयार झाले. त्यामुळे या शोने अनेक कलाकारांना मनोरंजन क्षेत्रात ओळख मिळवून दिली. ख्रिस्टी नोइंग्ज यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांसह सहकलाकारांनीही दुःख व्यक्त केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com