Delhi Bomb Threat: दिल्लीमध्ये हाय अलर्ट! स्वातंत्र्य दिनाच्या आदल्यादिवशी हायकोर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Delhi Bomb Threat: स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी दिल्लीत बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. उच्च न्यायालय, लाल किल्ला, विमानतळ, मेट्रो आणि रेल्वेला लक्ष्य करण्याची धमकी ईमेलमधून देण्यात आली.
Delhi Bomb Threat
Delhi Bomb ThreatSaam Tv
Published On

Delhi Bomb Threat: स्वातंत्र्यदिनाच्या अवघ्या एका दिवस आधी राजधानी दिल्लीत बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी एका अज्ञात ईमेलद्वारे दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना टार्गेट करण्याची धमकी देण्यात आली. यामध्ये दिल्ली उच्च न्यायालय, जिल्हा दंडाधिकारी (DM) कार्यालय, विमानतळ, लाल किल्ला, दिल्ली मेट्रो आणि रेल्वेगाड्या बॉम्बने उडवून देण्याचा दावा या ईमेलमध्ये करण्यात आला आहे. धमकीनंतर दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी दिल्ली उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांना धमकीचा ईमेल प्राप्त झाला. या ईमेलमध्ये दिल्ली उच्च न्यायालयात दुपारी २:११ वाजता बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली. तसेच, १५ ऑगस्ट रोजी दुपारी २:११ वाजता पुन्हा उच्च न्यायालयात आणि दुपारी ३:११ वाजता जिल्हा न्यायालयांमध्ये स्फोट घडवून आणले जातील, असा दावा करण्यात आला आहे.

Delhi Bomb Threat
Pune Mumbai Expressway Traffic Update: पुणे-मुंबई प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; बुधवारी तीन तास कनेक्टिंग लिंक बंद

याशिवाय दिल्लीतील सिव्हिक सेंटरमधील महापौर कार्यालयालाही ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. ईमेलमध्ये खलिस्तान आणि १९८४ च्या शीख-विरोधी दंगलींचा उल्लेख करण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. लाल किल्ला, दिल्ली मेट्रो तसेच अंबालाहून दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या रेल्वेगाड्यांना टर्गेट करण्याची धमकीही देण्यात आली आहे.

Delhi Bomb Threat
Crime News: पुण्यातील फेमस रीलस्टारला अटक; ५ हजारांहून अधिक बँक खात्यांतून १० कोटींचं मनी ट्रेल, हाँगकाँग कनेक्शन उघड

अनेक ठिकाणी तपासणी मोहीम

धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर संबंधित इमारती बंद करून तपासणी सुरू करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस, अग्निशमन दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकांकडून परिसराची तपासणी केली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालय बार असोसिएशनचे सहसचिव कुणाल मल्होत्रा यांनी ही धमकी प्राथमिकदृष्ट्या अफवा किंवा ‘होअक्स’ असल्याचं दिसत असल्याचं सांगितलं. मात्र, कोणतीही जोखीम न घेता सर्व खबरदारीचे उपाय करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट

१५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे आधीपासूनच राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. आता बॉम्बस्फोटाच्या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणांनी अधिक सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com