Pune Mumbai Expressway Traffic Update: पुणे-मुंबई प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; बुधवारी तीन तास कनेक्टिंग लिंक बंद

Pune Mumbai Expressway Traffic Update: कनेक्टिंग लिंकवर बुधवारी १२ ऑगस्टला दुपारी १२ ते ३ या वेळेत देखभाल-दुरुस्ती आणि मॉक ड्रिलमुळे पुणे-मुंबई मार्ग बंद राहणार असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
Pune Mumbai Expressway Traffic Update
Pune Mumbai Expressway Traffic UpdateSaam TV
Published On

Pune Mumbai Expressway Traffic Update: यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’च्या पुणे-मुंबई दिशेने जाणाऱ्या मार्गावर बुधवारी (१२ ऑगस्ट) तीन तास वाहतूक बदल करण्यात येणार आहे. देखभाल-दुरुस्तीचे काम आणि मॉक ड्रिल असल्याने दुपारी १२ ते ३ या वेळेत पुणे-मुंबई मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासून कनेक्टिंग लिंकच्या पुणे-मुंबई दिशेच्या मार्गिकेवर देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांची तयारी तपासण्यासाठी मॉक ड्रिलही घेण्यात येणार आहे. या कामामुळे या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

Pune Mumbai Expressway Traffic Update
Maharashtra Cabinet Decision: फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय, भूसंपादन मोबदल्याच्या व्याजदरात केला बदल

या कालावधीत पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घाट मार्गातून मुंबईच्या दिशेने वळविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करताना या वाहतूक बदलाची नोंद घ्यावी. तसेच पर्यायी मार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहनचालकांना प्रवासासाठी अधिक काळ लागेल हे लक्षात घ्यावे.

Pune Mumbai Expressway Traffic Update
Thalapathy Vijay: थलपथी विजय यांचा संसार पुन्हा रुळावर? पत्नी संगीताने घटस्फोटाची याचिका घेतली मागे

दरम्यान, कनेक्टिंग लिंकवरील मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारे मार्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीवर या निर्णयाचा थेट परिणाम होणार नाही. मात्र, दुरुस्तीचे काम आणि मॉक ड्रिल सुरू असताना वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक बदलाच्या कालावधीत वाहनचालकांना काही अडचण निर्माण झाल्यास मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी ९८२२४९८२२४ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. तसेच महामार्ग पोलीस विभागाशी ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com