Jharkhand assembly election
Jharkhand assembly election 2024 News | झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह झारखंडची निवडणूक जाहीर केली. येथे दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान १३ नोव्हेंबर रोजी होणार असून दुसऱ्या टप्प्याचे मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. यासाठी नोटिफिकेशन दिनांक १८ ते २२ ऑक्टोबर आहे. तसेच २५ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरदरम्यान उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. तर अर्जाची छाननी २८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर आहे. तसेच १३ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर या दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. या दोन्ही निवडणुकांची मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार.