Jharkhand Exit Poll : झारखंडमध्ये कुणाची सत्ता? कुणाला किती जागा मिळणार?

Jharkhand Exit Poll update : झारखंडमधील सर्व टप्प्याचं मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. पोलच्या अंदाजानंतर तेथील चित्र स्पष्ट झालं आहे.
झारखंडमध्ये कुणाची सत्ता? कुणाला किती जागा मिळणार?
jharkhand Saam tv
Published On

Jharkhand Exit Poll 2024 : झारखंडचं दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडलं आहे. झारखंड निवडणुकीची मतदान प्रक्रिया झाल्यानंतर एक्झिटचे पोलचे अंदाज समोर आले आहेत. ४ एक्झिट पोलपैकी ३ मध्ये भाजप नेतृत्वातील एनडीए सरकारला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर चौथ्या एक्झिट पोलमध्येही एनडीए मजबूत स्थितीत आहे. या चौथ्या पोलमध्ये २० जागांवरील निकाल जाहीर करण्यात आलेले नाही.

मॅट्रिझ एक्झिट पोलचे आकड्यानुसार, झारखंडमध्ये ८१ विधानसभा मतदारसंघापैकी ४२-४७ जागा भाजप नेतृत्वातील एनडीएला मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीला २५-३० जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तर १-४ जागा इतर पक्षांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

झारखंडमध्ये कुणाची सत्ता? कुणाला किती जागा मिळणार?
Jharkhand Assembly : काँग्रेसकडून जाती-जातीचं राजकारण; झारखंडमध्येही मोदींनी दिला 'एक है तो सेफ है' चा नारा

चाणाक्य स्टॅटेर्जीच्या पोलनुसार, भाजप नेतृत्वातील एनडीएला ४५-५० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर जेएमएमच्या इंडिया आघाडीला ३५-३८ ते ०३-०५ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच ३ ते ५ जागा इतर पक्षांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

झारखंडमध्ये कुणाची सत्ता? कुणाला किती जागा मिळणार?
Maharashtra Exit Poll : भाजप सर्वात मोठा पक्ष, पण महाविकास आघाडीकडे 'मॅजिक फिगर'

जेवीसीच्या एक्झिट पोलनुसार, भाजप नेतृत्वातील एनडीएला झारखंडमध्ये ४०-४४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जेएमएमच्या इंडिया आघाडीला ३०-४० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर फक्त एक जागा इतर पक्षांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये २० जागांचा समावेश करण्यात आलेला नाही. ८१ जागांमधील २० जागा सोडून उर्वरित ६१ जागांपैकी एनडीएला ३४ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीला २६ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. झारखंडच्या उर्वरित २० जागांपैकी काही जागा मिळाल्यास एनडीएला ५४ जागा मिळण्याची शक्यता आहे.

झारखंडमध्ये कुणाची सत्ता? कुणाला किती जागा मिळणार?
MATRIZE Exit Poll : महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार, कुणाला किती जागा मिळणार ?

उर्वरित २० जागांपैकी काही जागा इंडिया आघाडीला मिळाल्यास त्यांची संख्या ४६ होण्याची शक्यता आहे. २० पैकी अर्ध्या अर्ध्या जागा एनडीएला ४४ जागा आणि इंडिया आघाडीला ३६ जागा मिळतील. २० जागांपैकी अर्ध्या जागा मिळाल्या तरी एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com