One Nation One Election: एनडीए सरकार 'एक देश, एक निवडणूकबाबत गंभीर; कधी होणार लागू? नवी अपडेट आली समोर

NDA Government : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी भाषण देतांना 'एक देश, एक निवडणूक' चा उल्लेख केला होता. वारंवार होणाऱ्या निवडणुका देशाच्या प्रगतीच्या आड येत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केलं होतं.
One Nation One Election: एनडीए सरकार 'एक देश, निवडणूकबाबत गंभीर; कधी होणार  लागू? नवी अपडेट आली समोर
NDA Government
Published On

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार देशात एक देश, एक देश निवडणूक लागू करू करू शकते. त्याबाबत सकारात्मक असून त्याबाबत नवी अपडेट समोर आलीय. देशातील इतर पक्षांचा देखील या प्रस्तावाला पाठिंबा मिळेल असा विश्वास राजदला आहे. दरम्यान सत्तेत असलेली युतीसरकार हे संपूर्ण कार्यकाळ राहणार आहे. याच कार्यकाळातच एक देश , एक निवडणूकची अंमलबजावणी होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ऑगस्टला केलेल्या भाषणात एक देश एक निवडणूक लागू करण्यासंबंधी सुतोवाच केले होते. वारंवार होणाऱ्या निवडणुका देशाच्या प्रगतीच्या आड येत आहेत. 'एक देश, एक निवडणूक'साठी देशाला पुढे यावे लागेल, असं पीएम मोदी म्हणाले होते. लाल किल्ला आणि राष्ट्रीय तिरंगा साक्षी ठेवून देशाची प्रगती सुनिश्चित करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी त्यावेळी केले होते.

दरम्यान नुकताच्या पार पडलेल्या लोकसभा निवडणूक प्रचारातही भाजपने एक देश एक निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरावरील समिती स्थापन केली होती. यावर्षाच्या मार्च महिन्यात पहिले पाऊल म्हणून लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस त्यात करण्यात आली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या १०० दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची शिफारसही समितीने केली आहे.

One Nation One Election: एनडीए सरकार 'एक देश, निवडणूकबाबत गंभीर; कधी होणार  लागू? नवी अपडेट आली समोर
Assembly Election: तुरुंगातील आमदाराला विधानसभेचं तिकीट! जेलमधून कसा करणार प्रचार अन् मतदान? काय सांगतो कायदा? वाचा...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com