Election Commission: सात राज्यातील विधानसभेच्या ८ जागांसाठी होणार पोटनिवडणुका, जाणून संपूर्ण माहिती

By-Elections : बिहार विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. देशातील ७ राज्यातील ८ जागेसाठी या निवडणुका होणार आहेत.
By-Elections
Election Commission announces by-polls for 8 assembly seats across 7 Indian states, voting on November 14.saam tv
Published On
Summary
  • देशातील ७ राज्यांतील ८ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर.

  • बिहारसह जम्मू-कश्मीर, ओडिशा, झारखंड, मिजोरम, पंजाब, तेलंगाणा आणि राजस्थानमध्ये पोटनिवडणुका होणार.

  • या निवडणुका १४ नोव्हेंबर रोजी पार पडणार.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मतदान दोन टप्प्यात होणार आहेत. यासह देशातील ७ राज्यातील पोट निवडणुकांची घोषणाही मुख्य निवडणुक आयुक्तांनी केलीय. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जम्मू कश्मीर, ओडिशा, झारखंड, मिजोरम, पंजाब, तेलंगाणा आणि राजस्थानात विधानसभेसाठी पोटनिवडणुका होणार आहेत.

By-Elections
Prime Minister Resigns : पंतप्रधानांचा अवघ्या एका महिन्यात राजीनामा; या देशात PM च्या खुर्चीवर कुणीच का टीकत नाही? कारणे काय?

येथील ८ जागांसाठी पोट निवडणुका होणार आहेत. या निवडणुका १४ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील दोन जागांवर आणि इतर सहा राज्यांमधील प्रत्येकी एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

By-Elections
Bihar Election: धुरळा उडणार! बिहारमध्ये २ टप्प्यांत निवडणूक; मतदानाच्या तारखा जाहीर, निकाल कधी?

यात जम्मू-काश्मीरच्या बडगाम आणि नगरोटा, यासह राजस्थानमधील अंता, झारखंडच्या घाटशिला, तेलंगाणा जुबली हिल्स, पंजाबमधील तरनतारन, मिझोराम डम्पा आणि ओडिशामधील नुआपडी जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या सर्व जागांसाठी पोटनिवडणुका ११ नोव्हेंबर रोजी एकाच वेळी होतील. सर्व आठ जागांसाठीच्या पोटनिवडणुकांचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी बिहार निवडणूक निकालांसह जाहीर केले जातील.

..निवडणूक प्रक्रियेत तब्बल १७ बदल

बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाने महत्त्वाच्या १७ बदलांची घोषणा केलीय. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी ही माहिती दिली. हे १७ बदल बिहार निवडणुकीत राबवले जाणार आहेत. त्यानंतर त्यांची अंमलबजावणी देशभरात केली जाईल. या नव्या बदलांमळे प्रत्येक मतदान केंद्रावर १,२०० पेक्षा जास्त मतदार राहणार नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com