India vs Pakistan : पाकिस्तानात कधीच पाय ठेवणार नाही, PSL खेळायला गेलेले खेळाडू ढसाढसा रडले, विमानतळावर नेमकं काय झालं?

PSL 2025 Suspended: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावाचा परिणाम क्रिकेटलाही भोगावा लागतोय. यावेळी परदेशी खेळाडू पुरते घाबरून गेले आहेत. इंग्लंडचा खेळाडू टॉम करनला यावेळी रडूही कोसळल्याची माहिती आहे.
PSL 2025 Suspended
PSL 2025 Suspendedsaam tv
Published On

भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव वाढताना दिसतोय. याचा परिणाम क्रिकेटवर देखील पाहायला मिळाला आहे. सध्या पाकिस्तानात पीएसएल आणि भारतात आय़पीएल खेळवण्यात येत होती. मात्र या दोन्ही देशांमधील या क्रिकेट लीग स्थगित करण्यात आल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंडियन प्रीमियर लीग एका आठवड्यासाठी पुढे ढकलली असली आहे. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या पीएसएलमध्येही तेच पाऊल उचलण्यात आलंय.

पाकिस्तानमध्ये खेळाडूंची कशी आहे स्थिती?

पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंना शक्य तितक्या लवकर पाकिस्तान सोडून त्यांच्या देशात जायचं असल्याचं दिसून येतंय. दरम्यान, न्यूझीलंडचा स्टार खेळाडू डॅरिल मिशेलने एक विधान केलंय ज्यामुळे जगासमोर पाकिस्तानची प्रतिमा मलिन झाल्याचं दिसून येतंय. डॅरिल मिशेलने म्हटलंय की, तो पुन्हा कधीही पाकिस्तानात येणार नाही.

एका आठवड्यासाठी पीएसएल पुढे ढकलली

भारत पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या सुरु असलेल्या परिस्थितीमुळे पाकिस्तान सुपर लीगची अवस्था खूपच बिकट झालीये. पीएसएल सामने खेळवल्या जाणाऱ्या स्टेडियमपैकी एक असलेल्या रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर ड्रोनने हल्ला करण्यात झाला. या हल्लामुळे स्टेडियम पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळालं. ८ मे रोजी होणारा हा सामना पाकिस्तानने रद्द केला होता.

PSL 2025 Suspended
IPL 2025 मध्येच थांबवल्यास कोण होणार चॅम्पियन? RCB चं १८ वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल का?

PSL दुबईमध्ये होणार शिफ्ट?

भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे पीएसएलमध्ये खेळणारे परदेशी खेळाडूंची तारांबळ उडाली आहे. या हल्लामुळे या लीगमध्ये खेळणारे विदेशी खेळाडू प्रचंड घाबरले आहेत. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सर्व परदेशी खेळाडूंना दुबईला हलवलंय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मते, उर्वरित पीएसएल सामने दुबईमध्ये रंगणार आहेत.

काय म्हणाला डॅरिल मिशेल?

पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सध्या पीएसएलचा भाग असलेल्या न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूंनी किमान या दिवसांत तरी पाकिस्तानात परतणार नाही अशी जणू शपथ घेतली आहे. डॅरिल मिशेल पीएसएल २०२५ मध्ये लाहोर कलंदर्सकडून खेळत होता. बांगलादेशी आउटलेट बीडीक्रिकटाइमशी बोलताना, डॅरिल मिशेलने भारतासोबतचा पाकिस्तानचा तणाव कमी होईपर्यंत पाकिस्तानात परतणार नाही अशी जणू शपथ घेतली.

PSL 2025 Suspended
Ind Pak Tension : महेंद्रसिंह धोनी देशासाठी सीमेवर लढाई करण्यासाठी जावे लागणार? कारण...

टॉम करनला कोसळलं रडू

परदेशी खेळाडूंच्या भीतीबद्दल माहिती देताना बांगलादेशी रिशाद हुसैन याने सांगितलं की, इंग्लंडचा क्रिकेटपटू टॉम करनला या परिस्थितीमुळे रडू कोसळलं होतं. या कठीण काळात त्याला सांत्वन देण्यासाठी काही लोकांची गरज होती.

PSL 2025 Suspended
Virat Kohli: रोहित शर्मानंतर विराट कोहलीनं घेतला मोठा निर्णय, टेस्ट मॅचमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत; पण...

आयपीएलमध्येही खेळला होता डॅरिल

डॅरिल मिशेलच नाही तर पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी होणारा जवळजवळ प्रत्येक परदेशी खेळाडू हेच म्हणत आहे. डॅरिल मिशेल पहिल्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या टीमचा भाग होता. मात्र यंदाच्या आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये तो विकला गेला नाही आणि म्हणूनच तो पीएसएलमध्ये सामील झाला. ७ मे रोजी भारतीय लष्कर आणि हवाई दलाने क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com