
विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याने याबाबत बीसीसीआयला कळवले आहे. मात्र, बोर्डाच्या वरिष्ठांनी त्याला निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. पुढील काही दिवसांत विराटचा अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
विराट टेस्ट मॅचमधून निवृत्त होणार
द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, विराट कोहली इंग्लंड दौऱ्याआधी टेस्ट फॉर्मेट सोडू शकतो. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराटने टेस्ट मॅचमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. विराटने घेतलेल्या निर्णयाची माहिती त्याने बोर्डाला दिली आहे. इंग्लंड दौऱ्याआधी विराटचा हा निर्णय टीम इंडियासाठी मोठा धक्का ठरू शकतो.
इंग्लंडचा महत्त्वाचा दौरा येत असल्यानं बीसीसीआयने त्याला यावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. मात्र, अद्याप यावर विराटने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वीच रोहित आणि विराटने टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, ज्याने चाहत्यांना धक्का बसला होता.
कसोटी कारकीर्दीतला विराटचा प्रवास
विराट कोहलीने २०११ साली कसोटी कारकिर्दीस सुरुवात केली. आतापर्यंत त्याने १२३ कसोटी सामने खेळून ९२३० धावा केल्या असून, ३० शतके आणि ३१ अर्धशतके झळकावली आहेत. २०१४ ते २०२२ या काळात त्याने कसोटी संघाचं नेतृत्व केलं आणि ६८ सामन्यांपैकी ४० सामन्यांत विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.