
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे. बुधवारी आणि गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानने केलेल्या कुरघोड्यांना भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बलुच लेखक मीर यार बलोच यांनी बलुचिस्तानला पाकिस्तानकडून स्वातंत्र देण्यात यावं, अशी मागणी केली आहे.
यावेळी बलुचिस्तानमधील बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर जोरदार हल्ले चढवत गॅस पाइपलाइनही उडवून दिले आहेत. या घडामोडींमुळे पाकिस्तानला दुहेरी धक्का बसला आहे.
बीएलएचे हल्ले
बीएलएने दावा केला आहे की, त्यांनी पाकव्याप्त बलुचिस्तानमधील कीच, मास्टुंग आणि काची या भागांत पाकिस्तानी सैन्यांवर एकाचवेळी सहा ठिकाणी हल्ले केले आहेत. जमरान परिसरातील स्फोटात पाकिस्तानी लष्कराचा एक जवान ठार झाला आहे, तर इतर ठिकाणी झालेल्या सशस्त्र हल्ल्यांमुळे लष्कराला मोठ्या प्रमाणावर जीवित आणि आर्थिक नुकसान झाले आहे.
बीएलएने लष्करी सामान वाहून नेणाऱ्या ट्रकवर बॉम्बस्फोट घडवून आणला तसेच युफोन कंपनीच्या मोबाईल टॉवरचे नुकसान केले. संघटनेने स्थानिक लोकांना इशारा दिला आहे की, पाकिस्तानी सैन्याला मदत करू नये, अन्यथा त्यांना जबाबदार धरले जाईल. बीएलएने या सर्व कारवायांची जबाबदारी स्वीकारली असून, हे बलुच स्वातंत्र्यलढ्याचा भाग असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानची परिस्थिती बिघडली
बीएलएने पाकिस्तानवर त्यावेळी हल्ला चढवला,जेव्हा पाकिस्तान आणि भारताचे ड्रोन आणि हवाई हल्ले सुरू होते. आता पाकिस्तानला स्वतःच्या देशातील फुटीरतावादी कारवायांना सामोरे जावे लागत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.