
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. एवढेच नव्हे, तर पाकिस्तानातील एका महत्त्वाच्या धरणावरही हल्ला करून त्याला मोठे नुकसान केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यासाठी अत्याधुनिक आणि विशेष शस्त्रांचा वापर करण्यात आला.
भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. हवाई हल्ले करताना सावज अचूकपणे आणि नेमकेपणानं टिपणाऱ्या अत्याधुनिक शस्त्र प्रणालीचा वापर यात करण्यात आला. त्यात लोइटरिंग शस्त्रांस्त्रांचा देखील वापर करण्यात आला. पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती.
भारताने पाकिस्तानवर स्कॅल्प क्षेपणास्त्राचा वापर करून हल्ला केला. हे क्षेपणास्त्र राफेल विमानातून सोडण्यात आले. स्कॅल्प क्षेपणास्त्राचा वेग मॅक पॉइंट ८ आहे. जे ५६०-६०० किलोमीटरपर्यंत पोहोचून हल्ला करतो. स्कॅल्प क्षेपणास्त्र किल वेब रणनीतिचा हिस्सा आहे. भारताकडे अजूनही ३०० हून अधिक स्कॅल्प मिसाईल आहेत.
पहलगाम हल्ल्याचा बदला
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या २ आठवड्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई केली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही पावले उचलण्यात आली आहेत. या हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता. 'हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले जाईल, यावर आम्ही ठाम आहोत,' असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.