Naxalite Encounter: ऑपरेशन सिंदूरनंतर सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई, करेगुट्टामध्ये २२ नक्षलवाद्यांचा खात्मा

Naxalite Encounter in Chhattisgarh: छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या करेगुट्टा टेकडीवर पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या कारवाईत २२ नक्षलवाद्यांना सुरक्षा दलाच्या सैनिकांनी ठार केलं आहे.
Naxalite Encounter
Naxalite EncounterSaam
Published On

भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. अशातच छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवरील करेगुट्टा टेकडीवर सुरक्षा दलातील सैनिकांनी मोठी कारवाई केली आहे. सैनिकांनी केलेल्या कारवाईत २२ नक्षलवाद्यांना ठार मारलं आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून लवकरच अधिकृत निवेदन जारी केलं जाण्याची शक्यता आहे.

यापूर्वी, याच भागात करण्यात आलेल्या कारवाईत ४ नक्षलवादी ठार झाले होते, ज्यामध्ये एका महिला नक्षलवादी आणि एका वरिष्ठ नक्षलवाद्याचा समावेश होता.

हल्ल्यानंतर करेगुट्टा परिसरात सुरक्षा दलातील सैनिकांकडून शोधमोहीम राबवण्यात आली. या शोधमोहीमेदरम्यान २०० हून अधिक आयईडी जप्त करण्यात आल्या आहेत. सध्या सैनिक सुमारे ५,००० फूट उंचीवर असलेल्या करेगुट्टा पर्वतावर तैनात आहेत. जर नक्षलवाद्यांनी तेलंगणा सीमेवरून छत्तीसगडमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना थेट सैनिकांचा सामना करावा लागेल.

Naxalite Encounter
'आज माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला शांती मिळाली', ऑपरेशन सिंदूरवर शुभम द्विवेदीच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया | Mission Sindoor

सैनिकांकडून पहिल्यांदाच ‘ऑपरेशन करेगुट्टा’

यापूर्वी सैनिकांनी या पर्वतरांगांमध्ये कोणतीही कारवाई केलेली नव्हती, आणि त्याचा फायदा नक्षलवादी घेत होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. सैनिकांनी डोंगर ताब्यात घेतला असून, बिजापूरच्या हद्दीतील नीलम सराई, दोबे, नम्बी, दुर्गमगुट्टा आणि करेगुट्टा पर्वतरांगांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे.

Naxalite Encounter
BJP: 'घर सोडून पळा, कलमा म्हणत राहा', पाकिस्तानवर हल्ला झाला तेव्हा नेमकं काय घडलं; BJP मंत्र्यांकडून VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com