Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट, आरोपीविरोधात गुन्हा दाखल; नक्की प्रकरण काय?

Defamatory Post Against Amruta Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेचा वापर करून पोस्ट केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Amruta Fadnavis
Amruta FadnavisSaam
Published On

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. अमृता फडणवीस यांच्याविषयी एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेचा वापर करून पोस्ट केली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृता फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या त्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत.

दाखल झालेल्या तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांच्याविषयी चुकीची माहिती पसरवण्यासंदर्भात पोस्ट केली आहे. अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरून पोस्ट शेअर करून मानहानी केली आहे. तसेच सोशल मीडियात पोस्ट व्हायरल केली आहे.

Amruta Fadnavis
Operation Sindoor: कुंकू पुसणाऱ्यांचं नामोनिशान मिटवलं, कोणत्या पॉवरफुल्ल मिसाइलनं पाकड्यांना पाताळात गाडलं!

या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी कारवाई करत संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Amruta Fadnavis
PAK Anchor: लाईव्ह बुलेटीनमध्ये पाकिस्तानी अँकर ढसाढसा रडली, अल्लाहकडे केली प्रार्थना; नेटकरी म्हणाले 'मगरमच्छ के आंसू'

अमृता फडणवीस यांच्याविरोधात नक्की कुणी आक्षेपार्ह वक्तव्य केलं? आक्षेपार्ह भाषा वापरून पोस्ट करण्यामागचं कारण काय? याचा शोध पोलीस घेत आहेत.

Amruta Fadnavis
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचा पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com