Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचा पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका

Indias Airstrike Damages Neelum River Dam: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानवर जबरदस्त प्रहार केला. या कारवाईत पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका बसला आहे.
Operation Sindoor
Operation SindoorSaam
Published On

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानवर जबरदस्त प्रहार केला. या कारवाईत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र, फक्त दहशतवादी तळच नाही, तर भारताने पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका दिल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानच्या वृत्तानुसार, भारतीय हवाई दलाच्या जवानांनी सर्जिकल स्ट्राईकनंतर त्यांच्या जलसाठ्यावरही हल्ला केला आहे. यामुळे धरणाचे नुकसान झाले असून, पाकिस्तानला मोठा फटका मानला जात आहे.

असोसिएटेड प्रेसच्या मते, पाकिस्तानमधील ९ ठिकाणी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताने लष्कराच्या जवानांनी नीलम नदीच्या नौसरी धरणावर बॉम्ब टाकला आहे. भारतीय जवानांनी केलेल्या बॉम्बस्फोटामुळे धरणांचे मोठे नुकसान झाले आहे. नौसरी धरणातून वीज निर्मिती केली जाते. धरणाचे झालेल्या नुकसानामुळे वीज निर्मितीला देखील अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

Operation Sindoor
'आज माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला शांती मिळाली', ऑपरेशन सिंदूरवर शुभम द्विवेदीच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया | Mission Sindoor

पाकिस्तानी सेनेची प्रतिक्रिया

पाकिस्तानी सैन्याच्या म्हणण्यानुसार, सर्जिकल स्ट्राईकनंतर रात्री २ वाजता नौसरी धरणावर देखील बॉम्ब टाकण्यात आला. भारतीय सैन्याने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर नौसेर धरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाकिस्तानने याला आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लघंन म्हटलं आहे.

भारताने अद्याप यावर कोणतेही प्रतिक्रिया दिलेली नाही. नीलम व्हॅली भारतीय सीमेपासून फक्त ३ किमी अंतरावर आहे. हा भाग पाकव्याप्त काश्मीरचा आहे. पहलगाम हल्ल्यानंतर नीलम व्हॅली परिसरात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

Operation Sindoor
PAK Anchor: लाईव्ह बुलेटीनमध्ये पाकिस्तानी अँकर ढसाढसा रडली, अल्लाहकडे केली प्रार्थना; नेटकरी म्हणाले 'मगरमच्छ के आंसू'

पाकिस्तानात १०० जणांचा मृत्यू

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला त्याच भागात करण्यात आला जिथे अधिक दहशतवादी तळ आहेत. भारताने जैश ए मोहम्मदचे ४, लष्कर ए तोयबाचे ३ आणि हिजबुल मुजाहिदीनचे २ तळ उद्धवस्त केले आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या दहशतवादी संघटना पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत होत्या.

Operation Sindoor
Pakistan: 'भारत पाकिस्तानचं युद्ध झालं तर, माधुरी दीक्षित माझी..' मौलानाचं आक्षेपार्ह वक्तव्य; नेटकऱ्यांनी झापलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com