pakistan maulana
pakistan maulanaSaam

Pakistan: 'भारत पाकिस्तानचं युद्ध झालं तर, माधुरी दीक्षित माझी..' मौलानाचं आक्षेपार्ह वक्तव्य; नेटकऱ्यांनी झापलं

Pakistan Clerics Controversial Statement: सध्या भारत पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती आहे. अशातच पाकिस्तानमधील मौलानाने केलेलं आक्षेपार्ह वक्तव्यामुळे नेटकरी संतापले आहेत.
Published on

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर युद्ध छेडले जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. नुकतेच केंद्र सरकारने देशभरात मॉक ड्रिल आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून, सामान्य नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

अशातच पाकिस्तानच्या एका मौलानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

पाकिस्तानमधील एका मौलानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मौलाना आपल्या मुलासोबत दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये मौलाना एक आक्षेपार्ह वक्तव्य करतो, यामुळे प्रत्येक भारतीयांची माथी गरम होणार हे निश्चित आहे.

या व्हिडिओमध्ये मौलाना म्हणतो,'जर पाकिस्तान आणि भारताचे युद्ध झाले आणि या युद्धात पाकिस्तान जिंकला तर, माधुरी दीक्षित माझी असेल. मी तिला घेऊन जाईन', असं मौलाना आपल्या व्हिडिओत म्हणतो.

pakistan maulana
Mock Drill: उठा अन् सज्ज व्हा! मुंबई, ठाणे, पुणे; राज्यात १६ ठिकाणी होणार मॉक ड्रिल, पाहा यादी..

सोशल मीडियावर संतापाची लाट

मौलानाच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार टीकेची झोड उठली आहे. अनेक नेटकऱ्यांनी मौलानाने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा विरोध केला. तर, काही पाकिस्तानी नेटकऱ्यांनी 'हे वक्तव्य पाकिस्तानमधील सर्वांचं मत नाही, आणि अशा वक्तव्यांचा निषेध केला पाहिजे', असं स्पष्ट केलं आहे.

pakistan maulana
Mock Drill: काश्मीर ते केरळ अन् महाराष्ट्र, देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये होणार मॉक ड्रील; सरकारच्या काय आहेत उपाययोजना?

काही दिवसांपूर्वी काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशभरात शोक आणि संताप व्यक्त केला जात आहे. अशा संवेदनशील काळात पाकिस्तानमधील मौलवीनं केलेलं हे वक्तव्य अत्यंत संतापजनक असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

pakistan maulana
12th HSC Result: वाह रं पठ्ठ्या! सांगलीच्या पोराला प्रत्येक विषयात ३५ गुण, मार्कशीट सोशल मीडियात व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com